पुत्रकामेश्ठी यज्ञ भाग १
एक प्रसन्न सकाळ. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली. घरी एकटीच असलेली नयना कडक अश्या कॉफीचा झुरका घेत आपला आयफोन पाहत होती. पंकज ने तो ह्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिलेला. नयना वाळवेकर. एका उपसभापतीची कन्या. तिचे माहेर मोहिते हे राजकारणातील एक मातब्बर घराणे. नयनाही घरच्या राजकीय वातावरणात वाढल्याने तिच्यातहि ते नेतृत्व गुण आलेले. तरुण, गोऱ्या रंगाची, उंचपुरी अशी नयना चटकन लोकांचे लक्ष वेधून घ्यायची. कॉलेज मध्येही हुशार, बुलेट, चार चाकी गाड्या ड्रायव्ह करणे हा तिचा छंद, अगदी स्वच्छंद जगत होती ती आपले आयुष्य, घरची श्रीमंती कळसाला भिडलेली असताना देखील …