परतफेड भाग २
समोर स्क्रीन वरती हलणाऱ्या दृश्यावरून माझी नजर ढळत नव्हती. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा भावनिक झाल्यामुळे वाहात होत्या, अगतिक असल्यामुळे वाहात होत्या कि, बराच वेळ पापणी सुद्धा न लवल्यामुळे वाहात होत्या हे मलाच समजत नव्हते. माझी सर्वात जवळची व्यक्ती मला अशा प्रकारच्या भावनिक वादळात फेकून देईल असे मला कधीच वाटले नव्हते. जे आहे ते खरेच घडत आहे कि, स्वप्नांनी माझ्यासोबत छळवाद मांडला आहे. माझा मेंदू याचा निकाल लावू शकत नव्हता. मी नुसता बघ्याची भूमिका पार पाडण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हतो. पण घडणाऱ्या प्रकाराची कारणमीमांसा आणि त्याची पार्श्वभूमी मला जाणून घ्यायची …