वाचक हो कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी असाल समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा करत आहात.
आपला प्रतिसाद असाच मिळते राहो तुमचे प्रतिसाद, अनुभव कथा तुम्ही खाली दिलेल्या मेल आयडी वर पाठवू शकता तसेच तुम्ही माझ्या टेलिग्राम आयडी वर चॅटिंग करू शकता.
चला कथा पुढे नेऊ पावसाळा सुरू होता जुलै मध्ये अगदी जोरात सुरू होता. अशाच एका पावसाळी सकाळी सगळे ऑफिस मध्ये होते आणि निकी ला मेल आला, त्याच्या एका क्लायंट ने मेल पाठवून काही ऑर्डर कन्फर्म केल्या होत्या. लगोलग अर्ध्या तासाने फोन ही आला.
तिची सगळी बोलणी झाली आणि त्यांनी मेल वर purchase ऑर्डर पाठवून दिली. तिने व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करून किती वेळ लागेल, डिलिवरी कशी असेल, अँडव्हान्स किती लागेल, बाकीचे पेमेंट कधी कसे करायचे ही माहिती पुरवली आणि बाकीच्या गोष्टी डन केल्या.
तिने सगळ्यांना आत बोलावून बातमी सांगितली त्या प्रमाणे एक दोन तास मीटिंग करून सगळ्या गोष्टी वाटून दिल्या.
आता सगळ्यांना हुरूप आला होता, कंपनी सुरू झाल्या पासून ही एक अशी मोठी ऑर्डर होती ज्यामुळे कंपनी एका वेगळ्या लेवल वर पोचणार होती, त्यांच्या त्या प्रोडक्ट मध्ये काम करणाऱ्या कंपनीच्या स्पर्धे मध्ये निकी बरीच पुढे जाणार होती.
तिने लगेच दोन माणसे वाढवायला प्रकाश ला सांगितले, कॉम्प्युटर अँड डिझाइन साठी दोन मुली लगेच अपॉइंट करायला एका मॅनेजरला सांगितले. तीन महिन्यात सगळ्या ठिकाणी त्या त्या पॅकिंग मध्ये ती ऑर्डर पूर्ण करायची होती.
आता निकी ऑफिसला अर्धा तास लवकरच येत होती, अर्धा तास उशिरा पर्यंत बसत होती. प्रकाश लवकर येत नव्हता पण उशिरा पर्यंत थांबत होता, त्याचा एक वेगळा आधार निकी ला मिळायचा आणि हे प्रकाश ला माहित होते पण इतक्या दिवसात त्याने स्वतःहून कधीच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला नाही. तिची हुशारी, कामासाठी तिची मेहनत प्रामाणिकपणा त्याला खूप आवडत होता. घरी ती एकटाच असे, इथे उशीर झाला की निकी त्याच्यासाठी सुद्धा खायला मागवत असे, सकाळी कधी लवकर यावे लागले की ती त्याला बाहेरून खायला घेऊन यायची. पण त्याच्या ह्या नात्यात कुठेही वासना नव्हती ते एक छुपे प्रेम होते जे निकी मनापासून करत होती आणि प्रकाश च्या बाजूने त्याचा स्वीकार जरी झालेला नसला तरी नकार नक्कीच नव्हता.
एके दिवशी सकाळ पासून जोरदार पाऊस पडत होता, निकी महत्वाच्या मीटिंग साठी बाहेर गेली होती आणि ऑफिस मध्ये त्या ऑर्डर च्या पहिल्या डिलिव्हरीची तयारी चालू होती, सगळी बिले, लोडिंग रेसिप्ट्स, मेल, कॉन्फर्मेशन सगळे काही चालू होते. संध्याकाळी एक टेम्पो ऑर्डर घेऊन निघणार होता आणि रात्री उशिरा एका हायवे वर एक वेअरहाऊस मध्ये डिलिवरी करून परत येणार होता. सगळी पॅकिंग होऊन, गाडी लोड झाली, निकी ऑफिसमध्ये जस्ट येऊन बसली होती, अचानक ड्रायव्हर ची तब्येत बिघडली आणि त्याला दवाखान्यात न्यावे लागले, दुसरा ड्रायव्हर दुसऱ्या एका डिलिवरी साठी बाहेर होता काय करावे ह्यावर चर्चा सुरू होती, पॅक केलेले box, प्रोडक्ट नाजूक होते त्यामुळे खूप जबाबदार माणूस हवा होता ह्या पावसात ऐनवेळी कसा कोण भेटणार काही सुचेना.
प्रकाश – निकी च्या ऑफिस मध्ये गेला, तुम्ही म्हणत असाल तर मी जाऊन येतो. मला टेम्पो चालवता येतो लायसेन्स पण आहे “
निकी ला काय बोलावे कळेना, “पण तुम्ही. कशाला.”
प्रकाश – “कशाला काय, आपल्याच कंपनीचं काम आहे डिलिवरी वेळेवर झालीच पाहिजे. घरी कोणी नाही वाट बघणार, उद्या सकाळी मी पोहोचेन इथे . थोडा घरी जाऊन आराम करून पुन्हा हजर होईन
तुम्ही नका काळजी करू”
“आता तुम्ही पटापट सगळी कागद द्या फाईल द्या. गाडी पूर्ण लोड आहे, काहीतरी खाईन वाटेत, मी मध्ये फोन करेन डिलिवरी झाली की कळवतो.”
“मॅनेजर च्या आधी मला करा मी त्यांना मेसेज पाठवेन तुम्ही फक्त मला कळवा, आणि सांभाळून जा मी वाट बघतेय तुमची.”
तिच्या नजरेत प्रेम व काळजी होती.
प्रकाश टेम्पो घेऊन निघाला, रात्री १२.४५ ला त्याचा फोन आला की सगळी डिलिवरी झालेली आहे त्यांच्या सह्या घेतल्या आहेत. मी आता इथून निघतोय.
सकाळी ६./७ वाजता प्रकाश ने गाडी कंपाऊंड मध्ये उभी केली तो तिथून तो घरी गेला, दोन तास झोपून अंघोळ करून पुन्हा कामावर आला.
सगळे पेपर त्याने मॅनेजर ला दिले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या.
निकी ११ वाजता दुसरीकडे एक मीटिंग आटोपून आली, तिला सगळा वृत्तांत कळला. तिने प्रकाश ला आत बोलाविले
निकी – तुमचे आभार कसे मानू, काय बोलू काही कळत नाहीये
प्रकाश – मैत्रीत आभार मानतात का, मी हे काम कंपनी साठी कमी व आपल्या मैत्री साठी जास्त केले आहे तिने समोरून शेकहँड साठी हात पुढे केला, ह्यावेळी मात्र प्रकाश ने हात हातात घेऊन किंचित दाबला.
निकी ला सगळे अर्थ कळले ती गोड लाजली.
प्रकाश बाहेर येऊन त्याची कामे करू लागला.
पुढचे दोन आठवडे महत्वाचे होते तीन चार डिलिवरी होत्या आणि त्या सगळ्या मोठ्या होत्या. सगळे ड्रायव्हर लोडर व्यवस्थित काम करीत होते.
दुसऱ्या शहराच्या एका मोठ्या डिलिवरी साठी निकी स्वतः जाणार होती तिच्या गाडीने आणि माल पूर्ण दिल्यावर ती परत येणार होती कारण ती डिलिवरी कंपनीच्या हेड ऑफिस च्या जवळ होती.
तर मित्रांनो ही डिलिवरी नीट होणार का, ह्यात काय काय अडथळे येणार हे सगळे पुढच्या भागात बघू.
तुमचे प्रतिसाद अनुभव कथा मला मेल करत राहा, तुमचा रिप्लाय खूप महत्वाचा असतो.
मेल आयडी खाली दिला आहे
Bye