शेरास सव्वाशेर… भाग २
ठरल्याप्रमाणे आम्ही ‘डेक्कन’ला भेटलो… माझ्याकडे कंपनीची ‘शोफरड्रिव्हन कार होतीच… पण कारमध्ये बसल्याक्षणीच नंदाच्या कपाळावर आठी आली. “काय झाले ?” मी विचारले त्यावर तिने फक्त ड्रायव्हरकडे बघितले… मला ताबडतोब तिचे म्हणणे लक्षात आले. “नारायण, गाडी लेफ्टला थांबव…” मी म्हणालो… त्याप्रमाणे त्याने ती थांबवून मागे बघताच मी एक नोट त्याच्याकडे सरकावली व त्यास उतरण्यास सांगितले… खुश होऊन तो गाडी सोडून उतरला.मी, नंदा व चिराग असे तिघंही आता समोरच्या सीटवर आलो… मी सफाईने गाडी पुण्याबाहेर घेतली. थोडावेळ तर नंदा चिरागला इकड-तिकडच्या गमती-जमती दाखवत राहिली पण जसाच आम्ही ‘हायवे’ पकडला तसाच चिराग नंदाच्या …