भोगवाडी (भाग ३)
सरपंच रावजी पाटलाच्या धान्याच्या कोठारात संगीता सरपंचाची वाट बघत थांबली होती. तिच्याकडे एक खबर होती आणि ती खबर ती तुम्हाला सोडून कोणालाच सांगणार नाही असं तिने सरपंच रावजी पाटलाला ठणकावून सांगितलं होतं. संगीता म्हणजे रावजीची मुलगी शोभाची सगळ्यात जवळची मैत्रीण. “संगे, काय खबर हाय?” “सरपंच..” संगीता बोलू लागली पण मध्येच थांबली. “आता तोंड उचकटून बोलते का?” रावजी खेकसला. “सरपंच, मी गरीब घरची पोर हाये…” संगीताए घाबरत घाबरत सुरुवात केली, “त्यामुळे आदी वचन द्या की माज्यावर रागावनार न्हाई…” रावजीने एक भुवई उंचावली. “काय झालं? काई प्रोब्लेम हाये का?” “सरपंच, शोभा…” …