प्रेरणा … भाग 13
राजश्रीने चक्क जीन्स आणि टी-शर्ट घातला होता. जीन्सची टाईट फिटिंग तिच्या पायांचा शेप परफेक्ट दाखवत होती. वर टी-शर्ट अंगावर छान बसला होता. निळी जीन्स आणि पिवळा टी-शर्ट तिच्या गोऱ्या अंगावर खुलून दिसत होते. वर बघताबघता त्याची नजर तिच्या चेहेऱ्याकडे गेली आणि त्याला जबरदस्त शॉक बसला. गोऱ्या चेहेऱ्यावर लालचुटुक लिपस्टीक मॅचिंगची शोभा वाढवत होतेच पण चक्क कपाळावर लहानशी लाल टिकली होती. इतरवेळी साडीवरही टिकली न लावणारी राजश्री जीन्स टी-शर्टवर टिकली लावून त्याच्यासमोर उभी होती. ती टिकली तिने कुणासाठी लावली होती हे शोधायला शास्त्रज्ञाची गरज नव्हती. त्या एका रंगीत बिंदूने हिप्नोटाइज …