प्रेरणा … भाग 7

“म्हणुनच तुला सांगतो तू परत नोकरी कर… तेवढेच तुझेही मन गुंतलेले राहील आणि एक ठराविक रक्कम घरी येईल. तुझी ओढाताणसुद्धा कमी होईल.” आकाशने तिला सुचवले. तिने फक्त मानेच्या झटक्याने त्याची आयडिया भिंतीवरची पाल झटकावी तशी झटकून टाकली. “आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते…

सो, हा उपाय बाद… माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही”

“मान्य आहे पण म्हणुनच मी जमतील ते सगळे प्रयत्न करतो आहे ना… आपल्याकडे आज एकही वेलनोन – प्रसिद्ध क्लायंट नाह ही मोठी कंपनी आपल्याला ऑर्डर देत नाही. जोपर्यंत मोठी ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत हे असेच चालणार… होईल काहीतरी, बघतो मी…” एक क्षण घुटमळून प्रेरणा बोलायला लागली.

“आकाश… ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’चे नाव तू ऐकले आहेसच. आपल्याला जर त्यांची ऑर्डर मिळाली तर आपले सगळे प्रश्न सुटतील. ते नाव आपल्या क्लायंट लीस्ट मध्ये आले की मग बघायला नको. नुसत्या त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या तरी आपल्या कंपनीचे एक्स्पान्शन करावे लागेल.” बोलताना त्या विचारांनीच तिच्या डोळ्यात स्वप्नाळू भाव आले आणि तिचा चेहेरा फुलून आला. “छान स्वप्न आहे… पण फक्त स्वप्न… दिवा स्वप्न… त्यांच्यापेक्षा लहानसहान कंपन्या देखील आपल्याला ऑर्डर्स देत नाहीत आणि मल्होत्रा इंडस्ट्रीज आपल्याला ऑर्डर देणार आहे? माझे वडील काम करतात तिथे का तुझा भाऊ?” संपूर्णपणे जमिनीवर असलेल्या आकाशने प्रेरणाच्या स्वप्नाच्या फुग्याला टाचणी लावली.

तरीही मनात आलेले ‘तुझा बाप’ बदलुन त्याने ‘तुझा भाऊ’ म्हटले आणि सभ्यता दाखवली. तिचे हे दिवा स्वप्न कितीही मनोहर असेल तरी सत्यपरिस्थिती नजरेआड करायला आकाश तयार नव्हता.

“तुझे वडील अथवा माझा भाऊ – फॉर टॅट मॅटर – माझा बाप जर तिथे असता तर हा विषय तुझ्याकडे न काढता मी त्यांच्याशी बोलले असते आणि ऑर्डर घेउन आले असते. पण तशी परिस्थिती नसल्याने आपल्याला ‘आहे त्या परिस्थितीत काय करता येईल’ ते बघावे लागेल.” “इतका मस्त पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे… आणि आज शनिवार आहे… दोघांनाही आज चक्क अपॉइंटमेंट नसल्याने वेळच वेळ आहे… चल आत… ‘आहे त्या परिस्थितीत काय काय करता येईल’ ते प्रात्यक्षिकासहित दाखवतो तुला.” नाईट गाऊन मधुन दिसणाऱ्या प्रेरणाच्या शरीराच्या कर्व्हसकडे आशाळभूतपणे बघत आकाश बोलला. नुसत्या कल्पनेने त्याच्या लंगीत खळबळ झाली. “आकाश, प्लीज बी सिरीयस. तुला खरच जर सेक्स, मी, माझे हे शरीर,

अशा मस्त धुंद वेळी आराम करणे हे सगळे आवडत असेल तर प्लीज जरा सिरीयसली बोल माझ्याशी. आय हॅव अ प्लॅन…” तिच्या बोलण्यातील सिरीयसनेस त्याला स्पष्ट जाणवला आणि तिचा गंभीरपणा संसर्गजन्य असल्याप्रमाणे तोही गंभीर झाला. “ओके, व्हॉटस् द प्लॅन?” “तू मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या एमडी ला भेटायचे आणि आपल्यासाठी ऑर्डर मिळवायची” एक आवंढा गिळून आणि सगळा धीर एकवटून शेवटी प्रेरणाने सांगुन टाकले. बोलल्यानंतर ती आकाशच्या चेहेऱ्याकडे बघायला लागली. त्याचा चेहेरा टोटली ब्लँक होता. त्याला आपले म्हणणे ऐकू आले नाही का समजले नाही ते प्रेरणाला समजेना.

त्याचा तो चेहेरा बघुन तिने त्याला हलवले “आकाश, ए आकाश… काय म्हणतेय मी?” “तू काहीतरी प्लॅन सांगणार म्हणालीस. म्हणुन वाट बघतोय.” “अरे सांगितला ना आत्ता… लक्ष नव्हते का तुझे? अरे, तू मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या एमडी ला भेटायचे आणि आपल्यासाठी ऑर्डर मिळवायची” “आज सकाळीच तुझा मुड जर माझी मजा करायचा असेल तर तू कर… मी जातो… मला बरीच कामं आहेत”

‘”अरे अरे, असे काय करतोस… मी बोलतेय सिरीअसली आणि तू जातोस कुठे? काय झाले तुला?”

“तुला काही माहित आहे का ग मल्होत्रा इंडस्ट्रीज बद्दल? त्याचा एमडी सोड पण त्यांचा परचेसिंग मॅनेजरसुद्धा मला साधी अपोइंटमेंट देणार नाही. का उगाच छळतेस?” “मी इतक्या सिरीयस मूडमध्ये अशा विषयावर बोलताना तुला छळेन वा तुझी टर खेचेन असे वाटते तुला?” विचारताना न राहवुन प्रेरणाच्या डोळ्यात पाणी चकाकले. “मग ह्याला काय म्हणू मी? तू प्लॅन म्हणालीस तर मला वाटले खरचं तुझ्या मनात काहीतरी भन्नाट आयडीया आहे. पण ज्या कंपनीचा एमडी कोण आहे ते देखील मला माहित नाही त्या एमडीला मी भेटणार कसा आणि भेटून करणार काय?” “मला माहित आहे” प्रेरणा उत्साहाने सांगायला लागली “एमडी चे नाव आहे राज मल्होत्रा” “ओह, राज मल्होत्रा… नाम तो सुना होगा… तो राज मल्होत्रा? आयला, शाहरूख खानची इतकी मोठी फॅन असशील असे वाटले नव्हते मला. आणि तो तोतरा मला काय मदत करणार आहे? तो त्याच्या रा-वन ला नाही मदत करू शकला.”

आकाशने माफक जोक केला. प्रेरणाला हसवण्या ऐवजी त्याच्या जोकने तिला चिडवण्याचे काम चोख बजावले. “मी तुला शाहरूख खानकडे जायला सांगत नाहीये. डोन्ट इन्सल्ट माय इन्टिलिजन्स. मी तुला राज मल्होत्रा – मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या एमडी ला भेटायला सांगते आहे. आणि फॉर युअर काईंड इन्फोर्मेशन, रा-वन कसाही असला तरी त्याने नफा मिळवून दिला आहे… करोडोंचा… नुकसान नाही केले… आणि जो नफा मिळवतो तो यशस्वी असतो.” नाही म्हटले तरी तिच्या तिखट स्वराने आणि त्याला नसलेल्या तिच्याकडच्या माहितीने आकाश सटपटला. “अगं तो कशाला मला भेटेल आणि कशाला ऑर्डर देईल?”

“तू मध्ये मध्ये तिरकस न बोलता आणि फालतू जोक्स न मारता मला नीट बोलू दिलेस तर मला तुला बरेच काही सांगायचे आहे. सगळ्यात आधी, राज मल्होत्रा हा ‘तो’ नसून ‘ती’ आहे. ‘रवि मल्होत्राच्या काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघाती निधनानंतर मल्होत्रा इंडस्ट्रीजची एकमेव सर्वेसर्वा त्याची विधवा ‘राज मल्होत्रा’. ज्याप्रकारे तिने खचून न जाता सगळा बिजनेस सांभाळला त्यामुळे तिचे मार्केटमध्ये सॉलिड नाव आहे. गेले काही दिवस मी तिच्यावर रिसर्च करते आहे आणि मिळालेल्या माहिती वरून मला खात्री आहे की तू तिच्याकडून ऑर्डर मिळवू शकतोस आणि आपला बिजनेस आणि आपले भविष्य वाचवू शकतोस.

” कितीही नाही म्हटले तरी प्रेरणाच्या ह्या प्रभावी बोलण्याने आणि नुकत्याच मिळालेल्या नविन माहितीने आकाश सिरीयस झाला. प्रेरणा नुसती हवेत बोलत नसून खरच तिच्याकडे काहीतरी माहिती आहे आणि प्लॅन आहे हे त्याच्या लक्षात आले. ह्या अत्यंत अस्वस्थ गंभीर अवस्थेत त्याने आतून एक सिगरेट आणली आणि काडी पेटवून लाईट केली. आकाश सहसा सिगरेट ओढत नसल्याने त्याचे आत्ताचे स्मोकिंग त्याच्या अस्वस्थ मनस्थितीचे द्योतक होते. त्याचा पहिला झुरका पूर्ण व्हायच्या आत प्रेरणाने त्याच्या तोंडातून सिगरेट काढुन घेतली आणि गॅलरीमधुन खाली फेकून दिली. “सॉरी, तू सिगरेट पिऊ शकत नाहीस. कारण… राजला सिगरेट आवडत नाही.” प्रेरणा शांतपणे बोलली. “राज? तिचा काय संबंध माझ्या सिगरेट ओढण्याशी? मला काय तिच्या आवडीनिवडीशी करायचे आहे? एकवेळ तुला आवडत नाही म्हणालीस तर ठीक आहे पण तुला माहित आहे मी नेहेमी नाहीच ओढत सिगरेट…”

स्पेशल कथा वाचा :  बायको जाता माहेरी-(भाग-२)

“राजची आवड माहित असणे तुला गरजेचे आहे कारण ती एक विधवा स्त्री आहे जिला गेल्या कित्येक वर्षात पुरुष स्पर्श मिळाला नाही. तू एक पुरुष आहेस जो तिच्याकडून तिला खुष करून आपले भविष्य सुधारण्यासाठी ऑर्डर आणणार आहेस.” शेवटी प्रेरणाने आपला खरा संपुर्ण प्लॅन सांगितला. कुणीतरी तोंड काळे करायला सांगितल्या सारखा आकाशचा चेहेरा पांढराफटक पडला. भूत बघावे तसा तो प्रेरणाच्या दृढ निश्चयी चेहेऱ्याकडे बघत राहिला. तिच्या बोलण्याचा अर्थ तिचा प्लॅन त्याला आता कळला. नुसत्या कल्पनेने त्याला कापरे भरले. प्रेरणा खरच असे सुचवते आहे का आपली परीक्षा घेते आहे हेही निश्चित करणे त्याला कठीण जात होते. आपण काय प्रतिक्रिया द्यावी हेही त्याला समजेनासे झाले. पुतळा बनून तो तिच्याकडे बघत बसून राहिला. आपले बोलणे पचवायला आकाशला वेळ लागेल ह्याची खात्री असल्याने प्रेरणा त्याला डिस्टर्ब न करता आत गेली आणि अजुन चहा घेउन आली.

हाताला लागलेल्या गरम कपाच्या चटक्याने आकाश भानावर आला. “प्रेरणा, तुला कल्पना आहे तू काय बोलते आहेस… काय सुचवते आहेस ह्याची? तू भानावर आहेस? कुठलीही स्त्री नवऱ्याच्या हातून चुकून झालेली ‘अशी’ चूक देखील खपवू शकत नाही… आणि इथे तू स्वतः मला हे करायला सांगते आहेस? आणि तुला वाटलेच कसे मी हे असे करेन? अशा प्रकारे मी ऑर्डर मिळवेन असे तुला वाटावे हे माझे अपयश आहे. सॉरी, आय कान्ट डू टॅट… आय वोन्ट डू टॅट… प्लीज मला माफ कर…

” चहाचा कप तिथेच ठेऊन आकाश घरात निघून गेला. त्याची प्रतिक्रिया बघुन आणि त्याचे आपल्यावरील प्रेम बघुन प्रेरणाला मनोमन आनंद झाला. त्याच्याबद्दल वाटल असलेला आदर वाढला. पण तीही त्याच्यावरील प्रेमापोटीच हे दिव्य करायला तयार होती हे त्याला पटवून देणे ही आता एक कसोटी होती. प्रेरणा त्याच्या मागोमाग आत गेली. धुसफुसत सोफ्यावर बसलेल्या आकाशच्या बाजुला बसून तिने त्याचे हात हातात घेतले. तिच्या हातातून हात सोडवून घेउन आकाशने आपला निषेध नोंदवला.

त्याच्या अबोल्याला मूक संमती देणे तिला ह्या वेळेस परवडणारे नव्हते. तिने जबरदस्तीने परत त्याचे हात हातात घेतले. मनापासून आणि आपली सगळी सच्चाई आवाजात ओतून प्रेरणा बोलायला लागली.

“आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे.

मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे.

आपल्यासाठी… आपल्या भविष्यासाठी… प्लीज आकाश… मला समजुन घे… मी खूप विचारांती हा निर्णय घेऊ धजावले आहे… दुसरा कुठलाही उपाय उरला नाही…” “उपाय का नाही? मी पर्सनल लोन काढेन… मग सगळे व्यवस्थित होईल..

.” आकाशने एक प्रयत्न केला. “वेडा का रे तू? मी बँकिंग क्षेत्रातील आहे. ‘पर्सनल लोन मिळवण्यासाठी कागदपत्रांवरून प्रथम हे सिध्द करावे लागते की तुला त्या लोनची गरज नाही आहे आणि तू कधीही ते लोन परत करू शकशील…’ आहेत आपल्याकडे कागदपत्रं? देईल कुणी आपली गॅरेंटी? कुणाकडूनही ‘निरपेक्ष मैत्रीची अपेक्षा’ ठेऊ नकोस… शिवाय पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट जास्त असतो. आधीच हे लोनचे हप्ते परवडत नाहीत… कुठून आणणार त्या लोनच्या हप्त्यांसाठी पैसे?” “प्रेरणा, शहाणपण आणि मुर्खपणा ह्यात हाच फरक आहे…

शहाणपणाला सीमा असते…” “म्हण तू मला मुर्ख… आय डोन्ट माईंड… पण मला तुला यशस्वी झालेलं बघायचं आहे… मगच मी समाधानी होईन” “प्रेरणा, ‘जे हवसं वाटतं ते मिळवणे म्हणजे यश, पण जे मिळते आहे ते हवेसे वाटणे म्हणजे समाधान’…”

“हे जरी मान्य असेल तरी तुला यशस्वी झालेलं बघण हा माझा हक्क आहे… प्लीज माझा हक्क असा डावलू नकोस… जर त्यासाठी मी इतकी मोठी किंमत मोजायला तयार आहे तर प्लीज तू माघार घेऊ नकोस… विचार कर… ‘कालची चुक आणि उद्याचे स्वप्न यामध्ये आजची संधी आहे’… लोकांच्या चुकांवरून आपण शिकावे आकाश… त्या सगळ्या रिपीट करण्याएवढे आयुष्य नसते आपले…

” प्रेरणाची भाषेवरील हुकुमत आणि कन्विन्सिंग पॉवर वादादित होती… आपल्या बोलण्याचा आकाश कमीतकमी विरोध तरी करत नाही हे प्रेरणाचे यश होते… “विचार कर आकाश, जर तू ही एक संधी घालवलीस तर काय होईल… आपल्याला लोनचे हप्ते भरणे जमत नाही… पर्सनल लोन मिळणार नाही… मिळाले तरी परवडणार नाही… फॅक्टरी गहाण आहे जी जप्त होईल… कदाचित हे घरही… मी परत त्याच दळभद्री पॉलीटीक्स आणि त्या घाणेरड्या लोकांमध्ये परत जाईन… पण तू? इतक्या उमेदीने तू बिजनेस सुरु केलास… तुझी जिद्द तुझी धडाडी तुझा आत्मविश्वास… काय करणार ह्याचे? बासनात घंडाळन ठेवणार?

आणि ‘मराठी माणसाला धंदा जमत नाही’ ह्या वाक्याला पष्टी देत कठेतरी मान मोडून नोकरी करणार? लक्षात ठेव, ‘यश मिळाल्यावरच गतकाळातील उपेक्षेला किंमत येते’…” प्रेरणा बोलत होती आणि आकाश फक्त ऐकत होता… “आणि विचार कर, तुला ही ऑर्डर मिळाली… ह्या एका ऑर्डर नंतर तुला इतक्यात कुठेही जायची गरज नाही… तू प्रॉडक्शन आणि क्वालिटी कडे लक्ष देऊ शकशील… प्रोडक्शन वाढेल… ह्या ऑर्डरमुळे येणाऱ्या पैशात आपण फक्त लोनचे हप्ते नाही तर संपुर्ण लोन चुकवू शकू… एकदा ते झाले की तुला बिजनेस वाढवण्यासाठी वेळ देता येईल… माणसे नेमता येतील…

‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’ आपले क्लायंट आहेत म्हटल्यावर आपल्याला बाकीच्या कंपन्यांचा बिजनेस मिळायला काहीच अडचण नाही… आणि एकदा इतक्या ऑर्डर्स आल्या की मिळणाऱ्या पैशातून तुला अशी माणसे नेमता येतील जी त्यांच्या क्षेत्रात एक्सपर्ट्स आहेत… तुला आणि मला मग काम फक्त एकच… त्यांच्यावर लक्ष ठेवताना आपले आयुष्य मनसोक्त उपभोगायचे… ज्या माझ्या शरीराचा तुला इतका मोह आहे त्याचा हवा तेव्हा हवा तसा उपभोग तू तुला हवा तेव्हा घेऊ शकशील… आणि त्यासाठी कुठली किंमत मोजणार आहेस तू? तर राज मल्होत्राचे शरीर…

जे शरीर गेले कित्येक वर्षे उपाशी आहे त्या शरीराला शांत करणार आहेस तू… बिचारी राज… गेले कित्येक वर्षे ह्या शरीराच्या आगीत जळत असेल… तिलाही मदत होणार नाही का? म्हटले तर हे स्वार्था बरोबर परमार्थ साधणे नाही का?”

‘लॉजिक म्हणजे पद्धतशीरपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने चुकीच्या निर्णयाला पोहोचणे’ आकाश ऐकतो आहे आणि आपल्या बोलण्याने कन्विन्स होतो आहे हे बघुन प्रेरणा आपले लॉजिक वापरत होती. तिचे ते लॉजिक ऐकून आकाश स्तंभित झाला.

तिच्या वक्तृत्वाचा प्रभाव इतका होता की त्याला इतर काही सुचेनासे झाले आणि तिचे बोलणे पटायला लागले. तरीही त्याच्यातील सद्सद्विवेकबुद्धी प्रतिकार करू बघत होती. “अगं पण त्यासाठी सेक्स ची काय गरज आहे? इतर गोष्टी आहेत की…”

स्पेशल कथा वाचा :  न्यूड 1

“ह्या जगात सेक्स पेक्षा काही चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत तर सेक्स पेक्षा वाईट गोष्टी देखील आहेत… पण आकाश… सेक्स सारखी दुसरी गोष्ट कुठलीही नाही…

स्पेशली त्या स्त्रीसाठी जी गेले कित्येक वर्षे उपाशी आहे…”

“पण माझ्यात असे काय आहे की ती मला पटेल? कशावरून मी तिला सेक्ससाठी तयार करू शकेन? मी काही मदनाचा पुतळा नाही. माझ्यात काहीही सेक्स अपील नाही.” आकाशने आपली शंका मांडली. त्याच्या ह्या बोलण्यात त्याचा ‘ह्या’ गोष्टीसाठी होकार होता…

आपला नवरा दुसऱ्या स्त्री बरोबर रत होणार ह्या कल्पनेच्या डागण्या मनाच्या खोल कप्प्यात गाडून प्रेरणा त्याचे शंका निरसन करायला सरसावली. “आकाश, लक्षात ठेव – ‘सेक्स अपील म्हणजे ५०% जे तुमच्याकडे असते आणि ५०% जे इतरांना वाटते की तुमच्याकडे आहे’. ‘राज’ ही एक अत्युच्यपदी पोहोचलेली यशस्वी स्त्री आहे. तुम्ही जितके यशस्वी होऊन उंच उंच जाता तितके एकटे पडता. आपल्या यशाच्या बुरख्याआड ती एक अत्यंत एकाकी स्त्री आहे. तिचा हा बुरखा फाडून तिच्यापर्यंत पोहोचणे कुणाही यशस्वी अथवा सहजप्राप्य पुरुषाला जमणार नाही. ते तुझ्यासारख्या विवाहित सामान्य आणि पत्नीशी एकनिष्ठ माणसालाच जमू शकेल. विश्वास ठेव, हा जरी विरोधाभास असला तरी ह्याला ‘ह्युमन सायकोलॉजी’ म्हणतात…” “पण ती ‘राज’ मी काळी का गोरी बघितली नाही…” आकाशने आपला त्रागा मांडला “तुला तिथे एखादया संदरी बरोबर मजा मारायला जायचे आहे का एक ठराविक लक्ष समोर ठेऊन ते साध्य करायला जायचे आहे? राज तुझे साधन आहे का साध्य आहे?” प्रेरणाच्या ह्या चपराकीने आकाशला आपली चूक लक्षात आली. त्याचा मुड जरा डाऊन झाला. त्याचा बदलता मुड बघुन प्रेरणाला धोका जाणवला

“तसेही, एकदा दिवा बंद झाला की प्रत्येक स्त्री सुंदरच दिसते” आकाशकडे बघत प्रेरणाने डोळा मारला. त्याक्षणी ती इतकी मारू दिसत होती की सगळे संदर्भ विसरून आकाश तिच्याकडे झेपावला आणि पुढच्याच क्षणी प्रेरणाची तिच्या नाईट गाऊनशी फारकत झाली. इतक्यावेळ राज संदर्भात झालेल्या बोलण्याने आकाश उत्तेजीत झाला होता. त्यात गाऊन काढून टाकल्यावर समोर दिसणाऱ्या नग्न प्रेरणाने त्याच्या शरीरात भडकलेल्या आगीत इंधन टाकले.

आपली लुंगी सोडून आकाश प्रेरणावर तुटून पडला. आपला नवरा आपणहून परस्त्रीच्या स्वाधीन करायच्या आधी त्या संभोग होमात प्रेरणाने नवऱ्यावरील आपल्या एकाधिकाराची आहुती दिली. आकाश प्रेरणाचा देह उपभोगत राहिला तर प्रेरणा आकाशच्या ‘अस्पर्शित स्पर्श’ साठवून घेत राहिली. आपला नवरा शेअर करण्याचे दुःख नजरेआड करून नवऱ्याचे आणि त्याच्या भविष्याचे स्वप्न रंगवत ती अर्धांगिनी हसऱ्या चेहेऱ्याने नवऱ्याच्या रतिसुखात आपला वाटा उचलू लागली.

भरल्या दुपारी आकाशच्या चोटाची आणि मग पोटाची भूक भागवून झाल्यावर प्रेरणाने आकाशला आपल्या शिकवणीत घेतले. गेले काही दिवस तिने ‘राज मल्होत्रा’ विषयी काढलेल्या प्रत्येक गोष्टीची आकाशला माहिती करून दिली. आकाशही एका चांगल्या विद्यार्थ्या प्रमाणे, शिक्षिकेच्या पदराला हात न घालता, सगळ्या गोष्टी माहित करून घेत होता.

राजच्या आवडीनिवडी सवयी यांची आकाशला माहिती झाली. दोघांनी मिळून पुढील सर्व संध्याकाळ चर्चेत घालवली. तिच्याबद्दल प्रेरणाने मिळवलेली माहिती बघुन आकाश अवाक झाला. प्रेरणा किती मनःपूर्वक ह्या गोष्टीच्या मागे लागली आहे हे त्याला नव्याने उमगले. त्याचबरोबर तिच्याशी चर्चा करताना मनाच्या एका कोपऱ्यात आणि प्रेरणाच्या खोल डोळ्यात त्याला तिच्या यातना जाणवल्या. केवळ आपल्या प्रेमापोटी, आपल्या धेय्यासाठी आणि आपल्या यशासाठी आपल्या पत्नीचा हा त्याग त्याच्या मनात खोल रुतून गेला.

तिच्या ह्या त्यागाची सव्याज परतफेड करून तिला सर्व सुखे द्यायचीच ही खुणगाठ आकाशने मनाशी बांधली. तोही सर्वतोपरी ह्या प्लॅनच्या मागे लागला. प्रेरणाच्या माहिती प्रमाणे ‘राज’ काही कामासाठी दिल्लीहून मुंबईला आली होती आणि रविवारी रात्रीच्या विमानाने परतणार होती. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे रविवारी सकाळी प्रेरणाने राजला तिच्या एअरपोर्ट जवळच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये फोन लावला आणि एका ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ देऊन संध्याकाळी डिनरसाठी यायची गळ घातली. प्रेरणाचे रीडिंग तंतोतंत जुळले आणि भिडस्त स्वभावाच्या राजने तिचे आमंत्रण मान्य केले.

एका पुरुषाचे आमंत्रण बेधडक नाकारणाऱ्या राजला ओळखीने आलेल्या एका स्त्रीला ‘नाही’ म्हणणे जमले नाही. रात्री दहाचे फ्लाईट असल्याने संध्याकाळी सात वाजता तिच्या हॉटेलमध्ये यायचे प्रेरणाने कबुल केले मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवुन, एक दीर्घ श्वास घेउन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसऱ्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील ‘राज’ चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह घेउन दरवाजात उभी होती.

आकाश नेहेमीच्या रॉयल मूडमध्ये असता तर नक्कीच त्याच्या तोंडून लकेर निघाली असती “घारी गोरी द्वार खडी…” पण आत्ता त्याला तिच्या गोऱ्या घारेपणाकडे लक्ष दयायला वेळ नव्हता.

“गुड इव्हिनिंग मॅडम, मी आकाश… ‘आकाश इंडस्ट्रीज’ चा सीईओ… माझ्या मिसेसशी, प्रेरणाशी, तुमचे बोलणे झाले होते… आपण डिनर साठी सात वाजता भेटणार होतो. मी आत्ता इथे जवळ आलो होतो आणि माझे काम संपले म्हणुन मी लवकर आलो. विचार केला तुम्हाला वेळ असेल तर गप्पा माराव्यात… पण तुम्ही बिझी असाल तर मी दोन तास खाली लॉबीमध्ये बसून तुमची वाट पाहतो.” आपली ओळख करून देत आकाशने माहिती दिली. प्रेरणाचा होरा अचूक निघाला. एका कंपनीचा ‘सीईओ’ म्हटल्यावर त्याला लॉबीमध्ये वाट बघायला सांगणे ‘राज’ला अवघड गेले आणि मनाविरुद्ध तिने आकाशला रूम मध्ये यायचे आमंत्रण दिले.

तिची रूम म्हणजे एक मस्त अलिशान सुट होता. बाहेरच्या रूममध्ये एक छोटा आणि एक मोठा सोफा, रायटिंग टेबल, डायनिंग टेबल, मोठा एलसीडी टीव्ही, मोठा फ्रीज, कोपऱ्यात देशी-विदेशी मद्यांच्या बाटल्यांनी भरलेला लहानसा बार असा सगळा सरंजाम होता. मधल्या उघडया दारातून आतील बेडरूमची भव्यता दिसत होती. खोलीत भिंतीत बसवलेल्या स्पीकर्स मधुन कुठल्यातरी इंग्लिश गाण्याची ट्यून ऐकू येईल-न येईल इतकी हलक्या आवाजात झिरपत होती. खोलीत महागडया झुंबरातून पसरणारा उजेड वातावरणाला साजेसा होता. त्या उंची वातावरणामुळे आणि भपक्यामुळे आकाश दबून गेला. आलेले दडपण त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ते लपवायचा कुठलाही प्रयत्न आकाशने केला नाही. आश्चर्य म्हणजे ह्या उंची वातावरणाचा आणि भपक्याचा कुठलाही गर्व राजच्या चेहेऱ्यावर दिसत नव्हता. तिचा चेहेरा अगदी नॉर्मल दि सोफ्यावर बसण्याची खुण केली.

आपल्या टायची गाठ सैल करत आकाश सोफ्यावर टेकला. समोरच्या टीपॉयवर राज वाचत असलेले ‘शिवाजी सावंत’चे ‘मृत्युंजय’ ह्या सगळ्या उच्च वातावरणाशी फारकत घेत उपडे पडले होते. त्या सगळ्या उच्चभ्रू वातावरणात ते अजोड मराठी पुस्तक खुपच विजोड वाटत होते. राज ‘मल्होत्रा’ कडे मराठी पुस्तक बघुन आकाश वेडाच झाला.क्रमश:

4.5/5 - (2 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!