धरण -(भाग १)
लेखक नरेश नमस्कार मी नरेश. ही गोष्ट आहे आाजपासुन पंधरा वर्षापुर्वीची. तेव्हा मी कोल्हापुर जिल्हयातील चंदगड तालुक्यात तिल्लारी धरणावर सुपरवायझर म्हणुन नोकरीला होतो मुळात चंदगड तालुका हा संपूर्ण डोगराळ भागाने वेढलेला भाग आहे आजच्या तारखेला तालुक्यात 32 धरणं आहेत पुर्ण तालुका घनदाट जंगलाने वेढलेला आहे धरणाच्या आजुबाजुला दोन तिन छोटी गावं होती किराणा सामान व इतर गरजेच्या वस्तुंसाठी विस किलोमीटर लांब तालुक्याच्या ठिकाणी जावं लागे. धरणाच्या ठिकाणी नोकरीला लागुन मला पाच वर्षे झाली होती पगार ही चांगला होता धरणाचं काम जवळपास पुर्ण झाल होत सहा महीण्यांपुर्वी साडेतिन हजार मजुर …