Hello friends कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासाठी एकदम नवी कोरी स्टोरी घेऊन आलेली आहे.
दीपा एक गावाकडची साधी सरळ मुलगी नुकतीच 12वी पास करून पुढच्या शिक्षणासाठी शहरात आलेली. कॉलेजमध्ये ॲडमिशन तर झालेले पण राहायचे कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कॉलेजमध्ये हॉस्टेलची काही सोय नव्हती त्यामुळे तिला बाहेर कुठेतरी रूम बघून राहावं लागणार होतं. कॉलेजमधल्या एका प्यूनकडून तिला मुलींसाठी रूमची माहिती आणि ॲड्रेस मिळाला होता. ती तो अॅड्रेस आणि आपलं सामान घेऊन त्या दिलेल्या ॲड्रेस विचारत विचारत पोहोचली तर दरवाजा बंद होता त्यामुळे तिने 2/3 वेळा दरवाजावर टकटक केली तर दरवाजा साधारण चाळिशीतल्या एका बाईने उघडला.
नमस्कार मी दीपा माझं इथे xxxxxx कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे तर मला इथे राहण्यासाठी रूम मिळेल का? चेहऱ्यावर एक छानशी स्माईल ठेवून हो का नाही नक्की मिळेल म्हणत त्या बाईंनी तिला आतमध्ये बोलावलं व बसायला सांगून त्या बाई आतमध्ये गेल्या तोपर्यंत ती त्यांच्या हॉलमध्ये सर्वत्र नजर फिरवू लागली. बसायला सोफा त्याच्या समोर छोटासा टी-पॉय एका बाजूला एक मोठी टीव्ही आणि त्याच्या शेजारीच एक भलंमोठं बुकशेल्फ होतं त्यात बरीच पुस्तकं होती त्याच्या बाजूलाच एक छोटं कपाट होतं त्यात बरीच सारी मेडल्स आणि ट्रॉफीज होत्या. ती हे सगळं बघत असतानाच आत गेलेल्या त्या बाई हातात चहाचा ट्रे घेऊन आल्या त्यात चहासोबत बिस्किटंही होती. तो ट्रे तिथे खाली ठेवत त्यांनी तिला चहा घे म्हटलं पण ती ऑकवर्ड झाली कशाला उगाच तुम्हाला त्रास म्हणत नको नको बोलू लागली. अगं आधीच मला त्रास झालेला आहे सो तू आता चहा पिलास तरी चालेल काही हरकत नाही आणि सोबत बिस्किटंही आहेत खाऊन घे असं बोलत त्या तिच्या समोरच्या खुर्चीवर बसल्या.
दीपा चहा बिस्किटं खात होती तोपर्यंत त्या बाईंनी बोलायला सुरुवात केली तुझं गाव कोणतं? घरी कोण कोण असतं? 12वीला किती % मिळाले मग पुढे शिकून कशात करिअर करायचं आहे तुला? वगैरे वगैरे अशा हलक्या फुलक्या गप्पा मारत दीपाने आपला चहा संपवला. तशा त्या बाई बोलल्या चल आता तुला तुझी रूम दाखवते.