मादक माया (सत्य अनुभव) भाग ५

आणि तो पार्टीचा दिवस अखेर उजाडला. त्या दिवशी रविवार असल्यामुळे मी देखील निवांत होतो. मायाचे पार्लरदेखील रविवारी बंदच असल्यामुळे ती देखील पूर्ण दिवस घरीच होती. योगायोगाने तिचा नवरादेखील कामानिमित्त चार दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेल्यामुळे आणि तिची मुले त्यांच्या आजी आजोबांकडे राहायला गेली असल्यामुळे तिला रात्री माझ्यासोबत हॉटेलला डिनरला येणे शक्य होणार होते. खरं तर, एव्हाना माझ्या आणि मायाच्या वाढत्या जवळीक व मैत्रीमुळे बिल्डिंगमधील स्त्रियांमध्ये दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली होती.

आणि म्हणूनच आमच्या पार्टीमुळे बिल्डिंगमध्ये कोणत्याही फालतू चर्चेला उधाण येऊ नये यासाठी एकत्र न निघता पुढे मागे निघायचे ठरले. शेवटी तीही एक विवाहित स्त्री होती. उगाच आजूबाजूला बिल्डींगमध्ये कोणाला संशय नको म्हणून मी आधी पुढे जाऊन टेबल बुक करायचे व मायाने मागून रिक्षाने हॉटेलवर यायचे, असे आम्ही प्लॅनिंग केले होते. खरं तर मायासोबतच मला रिक्षात एकत्र बसून जाण्याची जबरदस्त इच्छा होती. त्यानिमित्ताने रिक्षात मायाशी बोलताना अधिक जवळीक साधता येईल या उद्देशाने! पण कोणी पाहिलेच तर उगाच गवगवा होऊ नये म्हणून आम्हीच वेगवेगळे निघण्याचा निर्णय घेतला.

मी बरोबर रात्री आठ वाजता रिक्षाने ठरलेल्या वेळी हॉटेलवर पोहचलो. तेथून मायाला फोन केला. माया देखील रिक्षाने निघाली होती, थोड्याच वेळात पोहचणार होती. तोवर मी हॉटेल मध्ये आत जाऊन Manager ला “Table for two” सांगत टेबलसाठी विचारले. त्याने देखील स्मितहास्य करत “Yes Sir, that one! Please be seated” म्हणत माझे आदरातिथ्य केले. रेस्टॉरंट खूपच अप्रतिम होते. प्रवेशद्वारापाशी रंगीत कारंजे, आकर्षक पडदे व रंगसंगती, बसायला मऊ कोच, मंद दिव्यांची रोषणाई, धुंद संगीत आणि संपूर्ण वातानुकूलित यामुळे आत आल्यापासून खूपच प्रसन्न वाटत होते. तसेच हे रेस्टॉरंट अंधेरी स्टेशनपासून लांब आणि नेहमीच्या रहदारीपासून दूर अशा एका लेन (गल्ली) मध्ये होते. आणि म्हणूनच मायाला आणि मला पूर्ण प्रायव्हसी मिळावी यासाठीच मी याची निवड केली होती. एकूणच रेस्टॉरंटचे वातावरण आल्हाददायक आणि खास करून प्रेमी युगुलांसाठी पोषक असेच होते. रेस्टॉरंटमध्ये त्यावेळी काही तुरळक कस्टमर्स, त्यातही जास्त कपल्स होते. आणि अशातच मी आमच्या टेबलवर बसून मायाची एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहत असतानाच समोरून माया आली…

स्पेशल कथा वाचा :  प्रेरणा ... भाग 3

माया…! माझी डियर सेक्सी माया…! माया माझ्या समोरच रेस्टॉरंटच्या दरवाजात उभी होती…! तिची भिरभिरती नजर मला शोधत होती. इतक्यात मी मायाला हात उंचावून हाय केले. ती देखील हात उंचावत हाय म्हणत माझ्याकडे येऊ लागली. मित्रांनो… त्यावेळच्या मायाच्या रूपाचे काय आणि कसे वर्णन ऐकवू? इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या जणू एखाद्या रंभेसमान तिचे रूप, लावण्य त्या हॉटेलच्या मंद प्रकाशात देखील उजळून निघत होते. रविवारच्या त्या धुंद सांजेला हलकासा मेकअप केलेली, जांभळ्या रंगाची डिझायनर सिल्कची सुळसुळीत साडी, त्यावर त्याच रंगाचा मॅचींग स्लीवलेस खोल गळ्याचा ब्लाऊज, हाय हिल्स सेंडल्स घालून दोन भरगच्च स्तनांच्या घळीत किंचित रुतलेले दोन पदरी नाजूक मंगळसूत्र आणि हातात छोटीशी पर्स मिरवत माझ्या दिशेने येत असलेली माया पाहताच मी अक्षरशः पागल झालो. खरं तर या क्षणी, त्या रेस्टॉरंटमध्ये माया शिवाय दुसरी कोणतीच अन्य स्त्री इतकी सुंदर व मादक दिसत नव्हती. तिची ती मोहक अदा बघून हॉटेल मध्ये बसलेल्या काही स्त्रिया तर तिच्याकडे ईर्षेने व पुरुष चावट नजरेने पाहत असल्याचे मी ओळखले. पण मला त्यांची कोणाचीही पर्वा नव्हती. माया चालत चालत माझ्या टेबलापाशी येत असताना तिचे लयबध्द हिंदकळणारे डौलदार नितंब पाहून मला माझ्या मनावर ताबा ठेवणे कठीण झाले होते. एव्हाना मायाला अशी पाहून माझ्या चड्डीत वळवळ चालू झाली होती. अहाहा! स्लीवलेस ब्लाऊजमुळे दिसणारे तिचे ते उघडे गोरे नाजूक दंड तिच्या मादकतेत अधिकच भर घालत होते. मी तर आधीपासूनच मायाच्या डेरेदार भरीव गांडीचा दिवाना होतो. त्यात मायाने आज सिल्कची सुळसुळीत साडी नेसल्यामुळे मायाचे गोल व रूंद ढुंगण भलतेच आकर्षक दिसत होते. मायाने साडीदेखील कंबरेच्या भलतीच खाली नेसल्यामुळे तिची खोलगट बेंबी व सपाट ओटीपोट स्पष्ट दिसत होते. खरं तर तिच्या स्तनांचा आकार आणि नितंबांची गोलाई कोणत्याही स्त्रीच्या मनात असूया, मत्सर निर्माण करेल अशीच होती. रेस्टॉरंट मधले अन्य पुरुष व वेटर देखील तिला पुन्हा पुन्हा हळूच मागे वळून चोरट्या नजरेने पाहत होते. काय करणार? माया होतीच तशी…! स्वप्नसुंदरी…रूपगर्विता…! कोणताही पुरुषाला क्षणात कामातुर करेल असेच तिचे मादक सौंदर्य होते. माया जवळ येताच तिच्या परफ्यूमचा एक मंद सुगंध माझ्या आजूबाजूला दरवळला. ती अधिक जवळ येताच तिला वेलकम करण्यासाठी मी उठून उभा राहिलो…

स्पेशल कथा वाचा :  मेहंदी ते मधुचंद्र……भाग 4

क्रमशः💐

1/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!