गावरान कोंबडीची मजा
मी अविनाश,,,,,गावात सगळ्यात जास्त शेती माझ्याकडे होती ते पण सुपीक. त्यामुळे माझ्याकडे पैसे पण चांगला खेळता असायचा नेहमी. त्यामुळेच माझे राहणीमान, माझा थाट काही औरच होता. थोडक्यात लोकांना हेवा वाटावा असा माझा थाट होता. माझे शेत जितके मोठे तितके माझ्याकडे लोक कामाला अधिक होते. मी हल्लीच एक नवीन शेत घेतले होते. थोडे नापीक होते. पण स्वस्तात मिळत असल्याने मी ते घेतले होते. मला तिथे ऊस लावायचा होता. माझ्याकडे वाटेकऱ्यांची कमी नव्हती. त्यातच माझ्याकडे गेले काही महिने गावातीलच पश्या कामासाठी म्हणून सारखी विचारणा करत होता. मी काही त्याला फारसा ओळखत नव्हतो पण ऐकून मला तो माहित होता. सारखे नाही नाही म्हणून मलाच कंटाळा आल्याने मी एकदा त्याला वाड्यावर बोलावले. …