वाळवंटी – 4
सासुबाई म्हणाल्या काळजी करू नकोस, माझ्या चुलत भावाची मुलगी आहे निर्मला अगदी साधी भोळी आहे आपल्या या डामरट अभिसाठी तीच बरी आहे विचारी त्याला समजावून घेईल. नीती रागात म्हणते आज रात्रीच मी यांना मामाजींना बोलण्यासाठी सांगते.लवकर एकदाच लग्न लावून द्या म्हणजे ते थारावर तरी राहतील.सासुबाई नीतीच्या डोक्यावरून हात फिरवत, खूप नशीबवान आहे ग तुझ्यासारखी सून भेटली.रात्री भावकीतल्या सगळ्या बायका शेकोटीसाठी बसल्या होत्या. शीतल आणि निर्मला चा खूप जमायचं आणि त्या दोघी एकमेकांचे सिक्रेट शेअर करायचे.शितलचा नवरा एका खाजगी संस्थेवर शिपाई होता आणि माहेरी अठरा विश्व दारिद्र्य.. त्यामुळे बिचारी शितल …