ऑक्सिजन
आज सकाळी उठल्यावर बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सुरु केला आणि सगळ्या चॅनेल्सवर एकच वृत्त दिसत होते. मराठी अभिनेत्री प्राजक्ता आणि रितिकाया गायब झाल्या आहेत. काल रात्रीपासूनच या दोघी बेपत्ता आहेत. बातम्यांमध्ये पुढे सांगत होते कि काल रात्री या दोघी सुद्धा पुणे शहरापासून ५० किलोमीटर दूर असलेल्या आनंदवन या गावाजवळ एका फाईव्ह स्टार रेस्टॉरंटच्या उदघाटनासाठी आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यावर दोघीही एकाच गाडीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या पण तिथपासून त्यांचा काहीच पत्ता नाही. त्यांची गाडीसुद्धा कुठेच सापडत नव्हती. तसेच त्या दोघींचे आणि गाडीच्या ड्राइव्हरचा फोन देखील बंद येत होता. सोशल मीडियावर देखील …