जन-गणना … भाग २
गुंजन तेथुन गेल्यानंतरचा सगळा वेळ कंटाळवाणा जात होता. तिला मोबाइल वर संपर्क करु पहात होतो. पण ती फोन उचलत नव्हती. सकाळ पासुन चाललेल्या शीतयुध्दाचा विचार करत होतो. काही मार्ग काढता येऊ शकतो का? ह्याचा विचार करत होतो. विचार करता करता मी कधी झोपलो ते कळलेच नाही. सकाळी लवकरच जाग आली. झोपेतुन उठलो तेच पोटाची हाक ऐकु आली. रात्री काहिही न खाता मी झोपलो होतो. मी किचनमध्ये जाऊन पोटपुजा उरकुन घेतली. गुंजनला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करु लागलो. पण तीचा मोबाइल स्विच ऑफ येत होता. गुंजनशी काहीच संपर्क होत नसल्यामुळे …