अगतिक..पण अलौकिक भाग 1
अगतिक..पण ..अलौकिक भाग 1 “पहा ना हो भाऊजी, तुमच्या मित्राने मला कसा त्रास द्यायचं ठरवलंय.. अगदी नको जीव झालाय मला.” शर्मीलावहिनी स्फुंदत स्फुंदत बोलत होत्या. “अगदी लहान सहान कारणांवरूनही माझ्याशी भांडतात. सारख ओरडतात मला,.” वहीनी रडताना अगदी लहान मुलीसारख्या दिसतात. अगदी गोऽड. कडेवर उचलून समजूत घालावीशी वाटते अगदी. काय बोलावं ते मला सुचत नव्हतं. राजन माझा जवळचा मित्र. दीड वर्षापुर्वी 34 चा तो अन 24 वर्षाच्या शर्मिलावहिनीच लग्न झालेलं होतं. खरं तर compramise असावं, कारण वहिनींना अजून 2 बहिणी आणि वहिनी सगळ्यात मोठी…. राजन एकुलता एक असल्याने अन मी त्याचा अगदीच जवळचा मित्र असल्याने मला त्याच्या घरी त्याच्या भावासारखीच वागणूक असते. लग्नानतर सर्व नवराबायकोत होतात तशी भांडणं राजन …