गणिताच्या मॅडमचं गणित
नमस्कार मित्रांनो, माझे नाव नंदू आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा मी बीकॉम् च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होतो. मी लहानपणापासूनच उडाणटप्पू स्वभावाचा होतो. कॉलेज ला गेल्यावर तर मला जणू पंखच फुटले होते. मी बिनदास्त जगत होतो. मी शिक्षणात तसा कच्चाचं होतो. त्यामुळे प्रत्येक परीक्षेनंतर माझी घरात आरतीच होत असे. पण कधी नापास मात्र झालो नाही. हेच समाधान. कॉलेजला पण माझे अभ्यासात फार काही व्यवस्थित चालले होते असे नाही. एकूणच परिस्थिती ठीकठाकचं होती. आम्हाला एकूण आठ विषय होते. बाकी सगळे विषय मला तसे बरे वाटायचे फक्त मला आवडत नव्हता तो गणिताचा विषय. काही केल्या माझ्या डोक्यात शिरत नसे. त्यामुळे कॉलेज ला मी तो तास चुकवण्याचा प्रयत्न करायचो. पण कधी …