संधी भाग – 6 (कोकीळ)
रात्री जेवण झाल्यावर प्रसादने अंजलीला तिच्या तो आल्यापासून शांत असण्याबद्दल विचारले. मुलाला झोपवून सांगते असे म्हणून अंजलीने झोपायची तयारी केली. अर्ध्यातासांनी दोघे त्या विषयावर परत आले. “आज कोणीतरी भेटले मला. ” अंजली म्हणाली. बोलताना तिच्या चेहऱ्यावर मृदुल अशी लाज होती. ” कोण? कुठे? ” प्रसादच्या कपाळावर आठी आली. ” ऑनलाईन. ” ती म्हणाली. “अच्छा केलं होतंस का लॉगिन? कोण होता तो? एकाशीच बोललीस?” त्याने विचारले. ” हो. सतप्पा सोनजे म्हणून आहेत.” ती म्हणाली. “मी पाहू शकतो का तुमचं चॅट?” त्याने विचारले. “नाही नको. प्लिज. मी फक्त तुम्हाला माहित असावे …