मादक माया (एक सत्य अनुभव) भाग ४

माया गेल्यावर मी दरवाजा लावून मी फ्रेश व्हायला आंघोळीला गेलो. आंघोळ करताना देखील मायाची “ती” सुंदर छबी डोळ्यासमोरून जात नव्हती. माझ्या “लकी चार्म” मायाला सकाळीच सकाळी समोर पाहून माझा दिवस चांगलाच जाणार होता. आंघोळ करताना सुद्धा माझ्या मनात मायाबद्दल भन्नाट कामुक विचार येत होते. पण यावेळी मी स्वतःवर ताबा ठेवत मायाच्या नावाने पुन्हा हातभट्टी चालवायचा विचार तूर्तास बाजूला ठेवला. खरं तर मला थोड्याच वेळात इंटरव्ह्यूसाठी मालाडला बरोबर 11 वाजता पोहचायचे होते. कांदिवली ते मालाड अंतर फार नसल्याने मी जेमतेम अर्धा ते पाऊण तासात बस किंवा रिक्षाने पोहचू शकणार होतो. मी आंघोळ आटपून, फ्रेश होऊन कपडे घालून तयार झालो आणि मायाने दिलेले मेदूवडा सांबार खायला सुरुवात केली. अहाहा…!!! मेदूवडा सांबारची चव तर एकदम अप्रतिमच होती. खरंच…मायाच्या हाताला सुंदर चव होती. अनेकदा मायाच्या घरात काही स्पेशल डिश केली की ती मला हमखास आणून द्यायची. कधी पावभाजी, पाणीपुरी तर कधी चिकन बिर्याणी, चायनीज…! रोज काहीतरी नवनवीन पदार्थ करून सर्वांना खायला घालायला तिला फार आवडे. खरंच…माया एक उत्तम सुगरण होती. खरं तर, मी सुद्धा एक खवय्या होतो. चमचमीत, स्वादिष्ट, रुचकर पण तितकेच पौष्टिक पदार्थ मला भयंकर आवडायचे. गावी असताना मी स्वतः काही पदार्थ बनवायला शिकलो होतो. पण इथे मुंबईत आल्यावर जेवणाचे तसे हालच व्हायचे. रोज रोज बाहेर हॉटेलचे जेवण खिशाला आणि तब्येतीला देखील परवडणारे नव्हते. म्हणून मी बिल्डिंग शेजारीच एका मेस (खानावळ) चालू केली होती. मायासारखीच छान जेवण करणारी पत्नी जर मला मिळाली तर किती बरं होईल या विचारातच मी नाश्ता संपवला. एव्हाना घड्याळात साडे आठ वाजले होते. नाश्त्याच्या निमित्ताने माझ्या डोक्यात एक कल्पना आली. जर माझ्या नोकरीचे पक्के झालेच तर मायाला पार्टी देण्याच्या निमित्ताने एखाद्या छान हॉटेलला लंच किंवा डिनरला घेऊन जायचे आणि मनातलं सारं काही बिनधास्त बोलायचं. येस… ठरलं तर मग! असा विचार करून मी उठलो. इंटरव्ह्यूला उशीर नको म्हणून मी दिलेल्या वेळेच्या आधीच त्या ठिकाणी पोहचायचे ठरवले. तसंही मुंबईच्या ट्रॅफिक बद्दल बरच काही ऐकून होतोच. याआधी मुंबईला नातेवाईकांकडे अनेकदा येणे जाणे झाले होते. त्यामुळे ट्रेन किंवा बसचा प्रवास मला नवीन नव्हता. पण उगाच चांगल्या कामाला उशीर नको म्हणून मी इंटरव्ह्यूची सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित फाईल करून बॅगेत भरली आणि रूम लॉक करून निघालो.

स्पेशल कथा वाचा :  लेडीज हॉस्टेल... भाग 2

माझ्या खोलीच्या 3 रूम सोडूनच मायाची खोली होती. नेहमी येताजाता मला मायाच्या खोलीवरूनच जावे लागे. मी निघालो. तितक्यात माया तिच्या गॅलरीत कपडे वाळत घालत होती. मला क्षणभर काल रात्रीचा प्रसंग आठवला.

“भावजी, कसे झाले होते मेदू वडे? आवडले का?” मायाने विचारले.

“हो तर, खूपच छान…एकदम चविष्ट. माया वहिनी, पण काहीही म्हणा, तुमच्या हाताला चव बाकी मात्र एकदम झक्कास आहे हा!” मी.

“इश्शsss…काहीही. थँक्यू! अहो, मला देखील आवडतं, असे नवीन नवीन पदार्थ घरीच बनवायला… आणि समोरचा जर मनसोक्तपणे तृप्त होऊन खाणारा असेल तर मलाही बरं वाटतं…” माया आजकाल हळूहळू माझ्याशी द्विअर्थी बोलू लागली होती हे माझ्या आता लक्षात यायला लागले होते. आजकाल तिच्या बोलण्यात, वागण्यात, पाहण्यात आजकाल प्रणयाचे, शारीरिक मिलनाचे आव्हान मला दिसू लागले होते.

“बरं वहिनी, मी निघतो. आज मालाडच्या महिला कॉलेजमध्ये माझा इंटरव्ह्यू आहे. उशीर होतोय.” मी म्हणालो.

“अय्या, हो का? अरे वाह…छान. माझ्याकडून ऑल द बेस्ट बरं का भावजी! पण जॉब लागला तर पार्टी हवी हो! आणि इंटरव्ह्यू कसा झाला ते पण कळवा, बरं का? मी फोनची वाट पाहेन. ऑल द बेस्ट”. असं म्हणत तिने विश करायला हात पुढे केला. मी तिच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी तिचा हात हातात घेतला. उफ्फ…!!! किती नाजूक मुलायम हात होता मायाचा, काय सांगू? तिचा हात हातात घेताक्षणी एका सुखद स्पर्शानुभवाची गोड संवेदना माझ्या सर्वांगाला झाली. या निमित्ताने मी पहिल्यांदाच मायाचा हात हातात घेतला होता. तिच्या नाजूक, मऊ, गुलाबीसर तळव्याचे पटकन दीर्घ चुंबन घ्यायची माझी जबरदस्त इच्छा झाली. जर याच हातात मायाने माझे…..! एक भलताच चावट विचार माझ्या मनात तत्क्षणी येऊन गेला. परंतु स्वतःवर प्रचंड संयम राखत नाईलाजाने मी तिचा हात सोडला.

“चला…येतो” मी म्हणालो.

“अच्छा. बाय” अस म्हणत ती देखील खोलीत गेली.”

…..

मालाडला इंटरव्ह्यूला मी लवकरच पोहचलो. इंटरव्ह्यू खूपच छान झाला. असिस्टंट प्रोफेसर या पदाकरीता माझी निवड होऊन पुढील सातच दिवसात मला रुजू होण्यास सांगितले होते. पगार देखील चांगलाच मिळणार होता. महिनाअखेर मुंबईतील सर्व खर्च भागवून एक चांगली रक्कम गावी पाठवता येणार या आनंदात मी घरच्यांना फोन करून ही बातमी सांगितली. तसेच मला नोकरी मिळाल्याचे कधी एकदा मायाला सांगतो असे झाले होते. मी लगेचच फोन करून तिला ही बातमी दिली. ती देखील बेहद्द खूष झाली व तिला प्रॉमिस केल्याप्रमाणे रविवारी संध्याकाळी अंधेरी येथे “सिल्व्हर डाईन” फॅमिली रेस्टॉरंटमध्ये डिनर पार्टीसाठी विचारले. तिने देखील लागलीच होकार दिला. खरं सांगू, तेव्हा मी देखील मनोमन चांगलाच सुखावलो होतो. पार्टीच्या बहाण्याने मला माया नावाच्या या मोहक स्वप्नसुंदरीला डोळे भरून पहाता येणार होते. आमच्या मैत्रीतील पुढील पायरी गाठून एक नवा अध्याय लिहिण्यास मी अक्षरशः अधीर झालो होतो. मायाची पण अवस्था माझ्यासारखीच झाली असेल का? या गोड सुखद विचाराने मी रूमवर परत जाण्यास निघालो.

स्पेशल कथा वाचा :  प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी बाबानं कडून झवून घेतले – भाग 3

क्रमशः💐

3/5 - (4 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!