जन-गणना …. भाग १
लेखक – विंड्या मी शाळेतुन घरी निघायच्या तयारीत होतो आणि तेवढ्यात, शिपायाने सर्व कर्मचा-याना मुख्याध्यपकांनी मिटिंगकरिता बोलवल्याचा निरोप दिला. खरे तर मला घरी लवकर जायचे होते कारण माझ्या गुंजनचा आज वाढदिवस होता. मला घरी जाऊन वाढदिवसाची तयारी करायची होती. तेव्हा मी नेहमी प्रमाणे मुख्याध्यपकांना इंटरकॉम वरुन त्यांची परवानगी घेण्याकरीता फोन केला. (मी नेहमीच मला मिटिंग टाळायची असली कि त्यांना फोन करुन परवानगी घेतो व ते तशी सुट देतात.) मी त्यांना माझी व्यथा सांगितली पण ह्यावेळी मात्र त्यांनी मला मिटिंग बुडवण्याची परवानगी दिली नाही. मिटिंग बुडवण्याची परवानगी न मिळाल्यामुळे मला मिटिंगला थांबणे आवश्यक होते आणि तसेहि काही खास कारण असल्याखेरीज सर मला कधीच अडवत नाहित त्यामुळे मी डोक्यातील सर्व …