संधी भाग -7 (कोकीळ)
लोकेशन मिळालेल्या ठिकाणी दोघे अगदी 12-15 मिनिटात पोहोचले. अंजलीने बाईकवरून उतरत मोबाईल काढला आणि सतप्पाला कॉल लावला. प्रसाद समोर अशा गोष्टी करताना तीला खरंतर खूपच संकोच वाटत होता. ती थोडं लांब गेली. ” हॅलो! तुमच्या चाळी समोर आलीये. तुम्ही आहात न घरी.” अंजली म्हणाली. ” हाये कि.. जरा लवकर आलो आज. असं करा. पहिला मजला चढलात का जिन्या समोरचं दार वाजवा. आपलचे. ” तो म्हणाला. ” ठीके. ” म्हणत तिने फोन ठेवला. ” अहो! जा तुम्ही. मी कॉल केला कि न्यायला या. ” ती म्हणाली. ” तू जां. त्याना …