रोहिणी
श्वेता निघून गेल्यावर मी परत एकदा माझ्या कोशात गेलो. वळणावरुन परत एकदा गाडी हमरस्त्याला लागली. एका सकाळी मी जॉगिंग वरून परत येत असताना मला हाक ऐकू आली. “सर!” माझ्या कॉलोनीच्या गेटजवळ गेटला धरूनच एक १८-१९ वर्षांची मुलगी उभी असलेली मला दिसली. रंगाने काळी सावळी आणि तब्येतीने सडसडीत होती. केस घट्ट वेणीमध्ये बांधले होते. चेहरा मात्र तजेलदार होता. डोळ्यात चमक होती. ह्या वयात डोळे असे स्वप्नील असतातच. तिचेही तसेच होते. अंगात टीशर्ट आणि ट्रॅकपँट होती. पायात कॅनव्हासचे शूज होते. मी थांबलो. “येस…? मी ओळखतो का तुला?” मी श्वास संथ करत …