तुझ्या सारखे कोणी नाही … भाग १
गाडीला आणखी तब्बल चार तास अवकाश होता. आणखी चार तास त्या भकास वेटिंग रूममध्ये कसे घालवायचे हा प्रश्न त्याला पडला होता. भिंतीवर फडफणाऱ्या कॅलेंडरच्या व्यतिरिक्त कोणताही आवाज तेथे नव्हता. मधूनच एखादी गाडी धडधडत पसार होतं होती.समोर दरवाजातून दिसणाऱ्या फलाटावरच्या भल्यामोठ्या घड्याळात अकरा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. मध्येच कुणीतरी दरवाजातून आत डोकावे आणि निघून जाई. मोबाईलचे चार्जिंग संपत आल्यामुळे त्याने तो चार्जिंगला लावला होता. आता टाइमपास काय करायचा म्हणून विचारात तो पडला होता.काही वेळ तसाच बसून राहिल्यानंतर उठून त्याने मोबाईल पहिला. ५१% चार्ज झाला होता. मोबाईल चार्जरसकट जॅकेटच्या खिशात …