बाळाला म्हणजे छोट्या चेतनला पकडून बसल्याने तिचा हात दु:खत होता, तसेही तिला सवय नव्हती , चेतन झाल्यानंतर पहिल्यांदाच ती बाइकवर बसली होती.
तिच्या थांबायला सांगायच्या विनंतीने मात्र तिच्या जिजूच्या मनात लड्डू फुटत होते…”सिता के साथ अब गिता भी मेरी हो गयी” असा तो मनोमन विचार करून गिता सोबत रोमान्सचे स्वप्न पाहू लागला.
गाडीवरून दोघे उतरताच तिने छोट्या चेतनला त्याच्याजवळ देऊन त्या झाडाच्या सावलीत एक सुस्कारा सोडला….
“ चेतनमूळे त्रास झाला का तूला?”
“ हो ना जिजू मला घ्यायची सवयच नाही , पहिल्यांदाच त्याला पकडून बसली आज गाडीवर “
“ पण गिता फक्त पंधरा मिनीटात आपण पोहचणार आहोत”
“ घाई झाली जिजू तूमाला”
“ नाही ग , तसेही साखरपुड्याला मुलाकडच्यांना यायला उशिर होणार आहे”
“ मग बसूया ना थोडे सावलीत , खूप छान वाटते “
“ फक्त बसायचेच का?”
“ मग काय करू म्हणता?” असे म्हणून तिने तिच्या मादक हसण्याने जिजूला पुर्ण वश केले होते, पण मनातून म्हणत होती की “तूझी आई आम्हाला भिकारी म्हणून हिणवून गेली , बघ तिला दाखवते आता माझी श्रीमंती….!!”
तो चेतनला मांडीवर घेऊन झाडाच्या खोडाजवळ बसला, ती अंतर ठेऊन बसणार तोच त्याने तिला त्याला जवळ बस म्हणून खुणवले, ती पण लगेच त्याच्या मांडीला मांडी लावून वडाच्या झाडाखाली दोघे गार सावलीत बसले. चेतनला त्याने हळूच जमिनीवर सोडले , तो खूप खूष होता…. एक स्माइल देत त्याने हळूच त्याच्या हातात तिचा हात घेतला, त्याने तिच्या हाताचे चुंबन घेतले….तशी ती बोलली “ जिजू तूमी गाडीवर काय बोलला होता?”
“ कशाबद्दल प्रिये?”
“ लव यू “
“ यस डियर, आय लव यू “
“ म्हणजे मी तूमाला हवी आहे”
“ नक्कीच गितू… मला पहिल्यापासून तूज्यात जादा इंटरेस्ट आहे”
“ समजा मी तूमाला माझे सर्वस्व दिले, सुयोगला चोरून तूमच्यात अडकले तर तूमी मला काय देणार?”
“ काय देणार काय विचारते? मागून बघ ,तूज्यासाठी जीव देईल”
“ तूमी जीव दिल्यावर दिदी उघडी पडेल , परत मलाही भिकारी सुयोगसोबत दिवस काढावे लागेल”
“ नवर-याला भिकारी काय म्हणतेस? कसाही असला तरी नवरा तो तूझा”
“ मी नाही म्हणत , तूम्ही लोकांनी त्याला भिकारी ठरवले”
“ म्हणजे कुणी? मी तर तूज्या बहिणीने शपथ दिली होती म्हणून तूज्याकडे येत नव्हतो”
“ तूमची आई आली होती माझ्या घरी , चार बायकात भिकारी बोलली सुयोगला”
“ अगं ती तशीच आहे, तिचे मनावर नको घेऊ”
“ मी तर विसरले जिजू पण मला श्रीमंत नवरा नाही मिळाला तरी श्रीमंत जिजू तर आहे ना… तेही या गरीब सालीवर प्रेम करणारे”
“का टोचून बोलतेस? एकतर खूप दिवसानंतर असा एकांत मिळाला” असे म्हणून त्याने तिला किस करण्याचा प्रयत्न केला पण तिने तो हाणून पाडला.
“ का असे करतेस गितू?”
“ सॉरी जिजू , घाई करू नका “
तरीसुध्दा तो त्या अगडबंब वडाच्या खोडाच्या आडोशाला तिला त्याच्या जवळ ओढू लागला…. तसे तिने त्याला थांबवत एक शेर सुनावला…
खुदा की रहमत में अर्जियाँ नहीं चलतीं,
दिलों के खेल में खुदगर्जियाँ नहीं चलतीं,
चल ही पड़े हैं तो ये जान लीजिए हुजुर,
इश्क़ की राह में मनमर्जियाँ नहीं चलतीं !
तिने आता छोट्या चेतनला मांडीवर घेतले, ती थोडी सेफ झाली तरी जिजू तिच्या केसात , गालावर हात फिरवून स्पर्श सुखाचा आनंद घेत होता , तसे करत तो बोलला…”
गिता नेमकं तूज्या मनात आहे तरी काय ?”
“ जिजू , तूमाला दिदीने माझ्याकडे येऊ नये म्हणून शपथ दिली होती मग आज कसे काय पाठवले तिने?”
“ त्या आरतीसाठी”
“ म्हणजे ?”
“ ती हट्ट धरून बसली , गिताताईला आणले तरच मी तयार होईल साखरपूड्याला म्हणून आलो”
“ तिला एकटीला वाटले पण आईबाबा ,भाऊ वहिणी किंवा तूमी मोठे बहिणी भाऊजी या सर्वाना मी नको होते ना”
“ तसे नाही गिता , पाहुण्यासमोर गरीबीचे प्रदर्शन नको व्हायला असे तूझा भाऊ म्हणत होता”
“ गरीबीपूढे नाते विसरला तूम्ही सर्व लोक”
“ तसे नाही गिता… पण सुयोगचा सर्वाना राग येत होता “
“ तो कसासाठी जिजू?”
“ते जाऊ दे ना आता…”
“ तूमाला माझी शपथ , खरे काय ते सांगा”
“ गिता सगळे सांगायला वेळ नाही पण एवढेच सांगतो की तूज्या लग्नाआधी म्हणजे तू सुयोगला पसंद केल्यावर सुयोगला खूप पैसे तूज्या भावाने ऑफर केले होते अन तेही केवळ तूला नाकारण्यासाठी कारण घरातल्या कुणालाच त्याच्यासोबत तूजे लग्न व्हावे असे वाटत नव्हते”
“ सुयोगने ते पैसे का नाकारले ?”
“ कारण त्यालाही तूच खूप आवडली होती, तो त्यावेळी म्हणाला होता की लग्न करेल तर तिच्या सोबत “
“ किती ग्रेट आहे माझा सुयोग… तूम्ही लोक श्रीमंतीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी किती मोठे षढयंत्र रचत होता “
“ बर जाऊ दे …. चल आपल्याला उशिर होईल “
“ जिजू माझी इच्छा नाही तेथे यायची , परत माझा अपमान तर होणार नाही ना तेथे आल्यावर”
“ तो कसा?”
“ ना माझ्याकडे चांगले कपडे ना तूमच्यासारखे दागदागिने…. परत कुणी भिकारी म्हणून हिणवायला नको”
“ मी काळजी घेईल तूझी , तूझी दिदी आजारी असल्याने नाहीतरी झोपूनच आहे , तिची साडी दागिने तिने तूज्यासाठी काढून ठेवले”
“ सुयोगबद्दल कुणी विचारले तर काय सांगू?”
“ मीच तूज्या अवतीभोवती राहील , तूही मला सुयोगच समज पण आता लवकर चल”
“ पण तूमीच मला लगेच कार्यक्रम संपला की आणून सोडाल कारण श्रीमंतीच्या वातावरणात घुसमट होते माझी”
“ओके डियर” म्हणून त्याने तिच्या मांडीवरून चेतनला उचलून घेतले , तसे करताना मुद्दाम तिच्या छातीच्या उभाराला त्याचा हाताचा स्पर्श करून त्याने अल्प सूख घेतले…..
लेखक ~रावसाहेब चव्हाण