चार दिवसांचा संसार -(भाग ७) | Marathi Incest Story

जन्मतःच किन्नर असलेल्या करम मध्ये एक उपजत गुणही असतो, तो म्हणजे त्याच्या हाताला उत्तम चव असते. कित्येकदा त्याला असं वाटायचं की आपल्या या गुणाचा वापर करून एक छोटीशी चहा नाश्त्याची टपरी उघडून स्वावलंबी व्हावं. परंतु, एक किन्नर असल्यामुळे ज्या समाजाने साधं त्याला कधी नोकरी नाही दिली त्या समाजात त्याला स्वतःचा धंदा उभारायला भांडवल मिळणं म्हणजे खूपच लांबची गोष्ट होय.

आदित्यच्या घरी त्याला किचन मध्ये यायला जरी बंदी असली तरी आता ती दोघं घरापासून वेगळे रहात असल्यामुळे व नोकर चाकर नसल्यामुळे करमच रोजचा त्या दोघांचा स्वयंपाक करत असे. वर म्हंटल्याप्रमाणे त्याच्या हाताला उत्तम चव असल्यामुळे आदित्यही त्याच्या पाककलेचं मनापासून कौतुक करत छान चविने जेवत असे व ते पाहून करमही भरून पावत असे. असाच एकमेकांच्या सहवासात त्या आगळ्यावेगळ्या जोडप्याचा सुखाचा संसार चालू होता. पण म्हणतात ना आयुष्यरुपी वस्त्रातील सुखदुःखांच्या धाग्यांपैकी फक्त एकच धागा सुखाचा असतो व बाकी शंभर धागे दुःखाचे असतात तसंच काहीसं आदित्य आणि करमच्या आयुष्यरूपी वस्त्राचं होतं.

एकदा एका रविवारच्या सकाळी घरातील वाणसामान संपल्यामुळे करम आदित्यला ते आणण्यासाठी बाजारात पाठवतो. खरं म्हणजे रविवारची सुट्टी असल्यामुळे आज दिवसभर आपण करमसोबत बेडरूममध्ये एकमेकांच्या मिठीत मस्त रोमान्स करूया असा त्याचा बेत असतो. पण करमने “सर्व गरजेच्या वस्तू संपल्यामुळे आधी बाजारात जाऊन वाणसामान घेऊन या व त्यानंतरच माझ्या जवळ या.” असा लाडिक धमकीवजा आदेश दिल्यामुळे मोठ्या मुश्किलीने आपल्या मनाला आवर घालून करमच्या ओठांचं एक छानसं चुंबन घेऊन तो बाजारात जातो.

आदित्यची बाईक एका बाजूने गेट मधून बाहेर पडताच जणू त्याच्या बाहेर पडण्याचीच वाट पाहत असलेली एक कार दुसऱ्या बाजूने त्याचा फ्लॅट असलेल्या इमारतीत शिरते व हातात ब्रीफकेस घेतलेली सुटाबुटातील एक रुबाबदार व्यक्ती त्या कारमधून उतरून थेट आदित्य आणि करम रहात असलेल्या मजल्यावर येऊन त्यांच्या फ्लॅटची बेल दाबते.

बेलचा आवाज ऐकल्यावर करमला वाटतं की आदित्य बाजारातून इतक्या लवकर कसा काय बरं आला? काही विसरला तर नाही ना? असा विचार करून जेव्हा तो दरवाजा उघडतो तेव्हा समोरील व्यक्तीला पाहून त्याला धक्काच बसतो.

स्पेशल कथा वाचा :  कामकथा -(भाग ३)

दारात उभी असलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ते चक्क आदित्यचे वडील हर्षवर्धनराय सिंघवी असतात.

मंडळी, तुम्हांलाही असा प्रश्न पडला असेल ना की जर करमसोबतच्या दुटप्पी आणि अक्षम्य वाईट वागणुकीला कंटाळून व त्यारात्रीच्या “त्या” प्रसंगामुळे त्यादोघांनी सिंघवी परिवारासोबत संबंध कायमचे तोडले तरीही आदित्यचे वडील हर्षवर्धनराय सिंघवी हे नेमके तिथं कशासाठी आले? त्यांना आपल्या वागण्याचा खरंच पश्चाताप झाल्यामुळे त्या दोघांची माफी मागून त्यांना परत आपल्या घरी न्यायला आले होते का? हो ना!

तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तरं नाही असंच आहे. कारण मुळचेच स्वभावाने कठोर, स्वार्थी, लालची व दुष्ट प्रवृत्तीचे असलेले हर्षवर्धनराय मनात एक नीच हेतू घेऊनच आले होते. तो हेतू म्हणजे ज्याच्यामुळे आदित्यसाठी श्रीमंत घरातील सून आणून आपला आर्थिक, व्यावसायिक फायदा करण्याच्या मनसुब्यांवर पाणी पडले, जो धड पुरुषही नाही व स्त्रीही नाही अश्या सिग्नलवर टाळ्या वाजवत भीक मागणाऱ्या एका किन्नराच्या कवडीमोल इज्जतीसाठी बंड करून आदित्यने सिंघवी परिवाराचा त्याग करत आपल्याशी कायमचे संबंध तोडले त्या करमचा आज कायमचा सोक्षमोक्ष लावून आदित्यच्या आयुष्यातील करम हा चाप्टर कायमचाच बंद करायचा.

जेव्हा करम त्यांना दारात उभं राहिलेला पाहतो तेव्हा त्याला काय बोलावं हेच कळतं नाही तेव्हा हर्षवर्धनरायच आवाजात नरमाई व चेऱ्यावर पश्चातापाचे नाटकी भाव आणून आजवर करमशी ते आणि त्यांचं कुटुंब जे काही वागले त्याबद्दल माफी मागतात. तसेच आपल्याला मानवने करमबरोबर केलेल्या निंदनीय कृत्याचीही लाज वाटत असून अशा नालायक मुलाचा बाप म्हणून त्याच्या अश्या वागण्याचा आपल्याला भयंकर पश्चाताप होत आहे असं म्हणत त्याला झालंगेलं विसरून आदित्य सोबत पुन्हा घरी येऊन नव्याने संसार करण्याची विनंती करत “यापुढे तुला आमच्यामुळे कसलाच त्रास होणार नाही” असं आश्वासनही देतात.

दुर्दैवाने, त्यांच्या या नाटकाला करम भुलतो व शेवटी कसेही असले तरी ते आपल्या पतीचे वडील व आपले सासरे असून आपणही त्यांच्या वयाचा, मोठेपणाचा मान ठेवत जास्त ताणून धरायला नको असा विचार करून आदित्यशी याबाबत बोलून काय ते सांगू असं म्हणत “आदित्य जरा बाहेर गेलेत व ते येईपर्यंत त्यांची वाट पाहत माझ्या हातचा घोटभर चहा घ्या” अशी विनंती करत दारात उभ्या असलेल्या हर्षवर्धनरायांना आत बोलावून सोफ्यावर बसण्यास सांगतो.

स्पेशल कथा वाचा :  फेसबुकवरच्या मित्राशी झाली चांगली मैत्री

करम त्यांच्यासाठी चहा करायला किचन मध्ये जाणार इतक्यात हर्षवर्धनराय त्याला हाक मारून आपल्या जवळ बोलावून आपल्या ब्रिफकेस मधून एक महागडा हिऱ्यांचा नेकलेस बाहेर काढत पुन्हा एकदा झाल्या गेल्या प्रकाराबाबत त्याची माफी मागून सिंघवी परिवाराची मोठी सून या नात्याने प्रेमाची भेट म्हणून करमला देऊ करतात तेव्हा करम ती भेट आपल्याला दागिन्यांचा अजिबात मोह नाही असं म्हणत नाकारतो. परंतु, “जर तू ही भेट घेतली नाहीस तर तू अजूनही आमच्यावर नाराज आहेस असं मी समजेन” असं म्हणत ते करमला इमोशनली ब्लॅकमेल करत तो हार स्वीकारायला लावतात. शेवटी नाईलाज होऊन करम ती भेट स्वीकारतो व त्यांच्यासाठी चहा करायला किचनमध्ये जातो.

कपटी हर्षवर्धनराय नेमकी या संधीचीच वाट पाहत असतात…

क्रमशः💐

3/5 - (5 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!