राणी -(भाग १)
आज सकाळपसूनच बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे. अंथरुणातून बाहेर यायचं जीवावर आलंय पण उठाव तर लागणारच होत. सकाळचे सात वाजून गेलेत अजून मी लोळतच होते. नवरा बाथरुममध्ये दाढी खरडत होता. सकाळी उठून नाष्टाच बनवायचा असतो दुपारी जेवायला तो घरीच येतो नेहमी म्हणून सकाळीच स्वयंपाकाची इतकी घाई नसते. आम्ही दोघ आणि सासू सासरे अस आमचं कुटुंब. लग्नाला २ वर्ष झाली आमच्या. मुलगा चांगला कमावता आहे घर दार छान आहे म्हणून घरच्यांनी माझं याच्या शी लग्न लाऊन दिलं. आणि मीही आनंदाने लग्न करून या घरात आले. सासू सासरे पण तसे …