प्रेरणा … भाग 8
“सॉरी पण तुम्ही आणि मराठी पुस्तक? नाही म्हणजे वाचू शकता पण एकतर मराठी आणि ते ही ‘असं’ पुस्तक?” आकाशने सहजपणे आपली शंका विचारली “हो, मीच वाचते मराठी. मी मुळची मराठी. राजश्री सहस्त्रबुद्धे. लग्नानंतर राजश्री ची राज झाले.” राजने खुलासा केला. “वा, प्रेरणा तुम्हाला भेटून जाम खुष होईल. आम्हा दोघांनाही मराठी मित्रमंडळी असली की अजुन काहीही लागत नाही.” बोलता बोलता आकाशने प्रांजळपणे तिला आपल्या मैत्रीमध्ये ओढले. पण तसे करताना तो केवळ स्वतःबद्दल बोलत नसून प्रेरणा आणि त्याच्या बद्दल आणि त्यांच्या ग्रुप बद्दल बोलत होता. त्याच्या बोलण्यातला सहजपणा राजला कुठेतरी जाणवून …