सासूची काळजी-(भाग ७)
‘आज मुंबईत परत येणं जमणार नाही’ असं मोहनरावांच्या सेक्रेटरीने त्यांच्या बायकोला म्हणजे मीराला फोन करून कळवलं. मोहनराव कामानिमित्त दिल्लीत होते आणि दिल्लीतलं त्यांचं काम आठवडाभर लांबलं होतं. मीराने रागाने फोन बंद करून ठेवून दिला. मोहनरावांचं हे वाढतच चाललं होतं आजकाल. गेलं वर्षभर बघितलं तर महिन्यातले सात-आठ दिवस सोडून उरलेले सगळे दिवस सतत फिरतीवर असायचे ते. पण आज मीराचा वाढदिवस होता. निदान आपल्या वाढदिवसाला तरी आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी वेळ काढावा या अपेक्षेत चूक काय होतं? पण नाही. एक डायमंड नेकलेस काल रात्री बारा वाजता बरोबर केकसह घरी डिलिव्हर होईल इतपत …