सुड
.अनघा! किती सुंदर नाव आहे. गीतेमध्ये एका ठिकाणी कृष्णाने अर्जुनाला अनघ हा शब्द वापरलाय. अनघ म्हणजे निष्पाप. अनघा नावाप्रमाणेच होती. निष्पाप. निरागस. लाघवी. सुंदर. त्या दिवसात मी सकारात्मक विचार करा वगैरे टाईपचे लेख लिहायचो. माझे लेख वाचून तिला राहवलं नाही आणि तिने माझा नंबर शोधून मला एकदा डायरेक्ट फोनच केला. आमचं पहिलंचं संभाषण पण तिच्या पहिल्याच बोलण्यात तक्रार होती. आपल्या नवऱ्याबद्द्ल, आपल्या आईवडीलांबद्द्ल, आपल्या नशीबाबद्द्ल. मी शांतपणे ऐकून घ्यायचो. जमेल तसं सांत्वन करायचो.पण मी तिला जितकं शांत करायचो तिचा बांध अजूनच फूटायचा. म्हणायची, सर! तूमच्याशी बोलून हलकं वाटतं. थोडं …