माझा प्रवास भाग दोन
“आला,,,,आला,,,,, कॉल आला” “हॅलो,,, हा,,कोण बोलतंय!, ,, हॅलो” झटकन डोळे उघडले. कसलं स्वप पडलं होत. मीनाक्षी कॉल करेल का केला तर केला बघू. असं मनात बोलत मी फोन घेतला. चार मिस कॉल ते पण अंनोन नंबर वरून.मी डोळे चोळत मोबाईल पाहिला. कसलाही विचारनकरता रिटर्न कॉल केला. माझे हृदय धडधडत होत. चार रिंग झाल्या कॉल उचल्ला जात नहोता. उचलत नसल्याने कॉल कट झाला. मी स्वतःला शिव्या देत उठलो आणि फ्रेश व्हायला गेलो. मी प्रतविधी उरकून अंघोळ करणार तितक्यात परत मोबाईल वाजला. मी तसाच बिना कपड्याचा बाहेर आलो आणि मोबाईल पाहिला …