श्वेता वहिनी भाग २
“तू… मिताली?” मी हतबुद्ध होत विचारले. उत्तरादाखल तिने फक्त डोळे मिटले. माझे हात आपसूकच मागे आले. मी थोडा मागे सरलो. तिला पहिल्यांदा पाहून ओळख असल्यासारखे का वाटले होते ह्याचा उलगडा झाला होता. तिने डोळे उघडले. माझ्याकडे पाहात तिने मागे पाऊल टाकले आणि ती जिन्याच्या दरवाजाकडे गेली. आत जात तिने दार लावले. मी तिथेच जे काही स्वप्नवत घडले त्याचे आकलन करत उभा होतो. ***** पंधरा वर्षांपूर्वी मिताली माझ्या बहिणी सोबत माझ्या घरी आली होती. १३ वर्षांची मिताली. दोन वेण्या रिबिनींमध्ये बांधून एक ढगाळ टीशर्ट घालून खाली जीन्स घातलेली मिताली. अंगाने …