आकस्मात … भाग 6
रेखाने फोन ठेवताक्षणीच मी सीमाला फोन लावण्यासाठी ‘फोनबुक’मध्ये जायच्या आधीच मला तिचाच ‘मिस्ड कॉल’ दिसला म्हणजे मी रेखाशी बोलत असतांनाच तिनेही मला फोन केला होता.मी ताबडतोब तिला फोन लावला तर पहिल्याच ‘रिंग’ला तिने तो रिसीव्ह केला. ” सीमा मला आत्ता रेखाचा फोन आला होता..” मी म्हणालो. ” माहित आहे मला… तिने माझ्याकडूनच तुझा नंबर घेतला होता.” सीमा म्हणाली ” तुझ्याशी काय काम आहे असे तिला मी विचारले देखील पण तिने उत्तर द्यायचे टाळले.” ” काय असू शकेल असे तुला वाटते ?” “मोस्टली कालच्या तुमच्या मास्क्स बदलण्याबद्दलच असेल ..” सीमा म्हणाली “पण शक्यतोवर तू तिला ‘आपल्या संबंधांबद्दल’ कळू देऊ नकोस..” ” ठीक आहे ..” मी म्हणालो “तू निश्चिंत रहा.. …