मी crossdresser आहे. पण मी हे कोणालाही सांगितलं नाहीये. माझं वय पंचवीस वर्ष. मी कन्टेन्ट रायटर आहे आणि फ्रिलान्सर म्हणून घरूनच काम करते, माझी सगळी कामे मेलवर किंवा व्हाट्सऍप वर पूर्ण करते त्यामुळे कुणाशी तसा प्रत्यक्ष संपर्क येत नाही फारसा. मी वर्षभरापूर्वी मी मुलगी बनून या घरात भाड्याने राहायला आले. इथेही कोणाशी संपर्क नाही येत, भाड्याचे पैसे ऑनलाइनच पाठवते. तेव्हापासून मी कायमच मुलगी बनून राहते. आता तर मी विसरली सुद्धा आहे कि मी मुलगा आहे हे.मी सकाळी उठते सात आठ वाजता.तासभर योगासने करते. अंघोळ वगैरे आवरून एक छानशी साडी नेसते. स्वतःसाठी नास्ता आणि कॉफी बनवते आणि नऊ वाजता लिहायला बसते. दोन तीन तास लिहून झाल्यावर मी उठते आणि मग जेवण बनवते आणि खाते. दुपारी जेवणांनंतर एक छानशी डुलकी घेते. दोन वाजता परत लिखाणाची कि कामं असतील ती करायला बसते आणि मग चार पाच पर्यंत सगळी दिवसाची कामे संपतात. आणि मग मी चहा पिते.संध्याकाळी मी नटते, कोणी पहायला नसलं तरी मी स्वतःसाठी छान प्रकारे तयार होते आणि स्वतःचे फोटो इन्स्टा वर टाकते. तिथे मी काही फ्रेंड्स तयार करण्याचा प्रयत्न करते पण मी कोणाच्याही जास्त जवळ नाही जात. फोटोसेशन झाल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या हजारो पुस्तकांच्या लायब्ररीतून जे पुस्तक काळ वाचत होते ते आणि जर ते संपलं असेल तर दुसरं पुस्तक काढून तासोन्तास वाचनात गढून जाते. मला पुस्तके वाचायला प्रचंड आवडतात मुख्यत्वे कादंबरी, मी मराठी आणि इंग्लिश पुस्तकेही वाचते.रात्री आठ वाजता रात्रीचा स्वयंपाक करून जेवते. तेव्हा मी गाणी लावलेली असतात. मला गोंगाट नसलेली गाणी आवडतात, शांत गाणी.. नवी जून . मराठी…. हिंदी… इंग्लिश सगळीच. जेवल्यानंतर मी भांडी घासून किचन आवरून कपडे चेंज करते. मी नाईट गाऊन घालते. कारण साडी मध्ये मला झोपायला अनकम्फरटेबल वाटतं. असा माझा साधारणतः दिनक्रम चालू असतो.मला महिनाभर आपल्या शेजारी कोण राहतं हेच माहित नव्हतं. एक दिवस संध्याकाळी मी वाचत असताना बेल वाजली, माझ्याकडे तसं कोणीच येत नाही त्यामुळे कोण आलं असावं हा विचार करत मी उठले आणि दरवाजा उघडणार तोच मी पुन्हा मागे फिरले आणि आरश्यात पाहिलं. मी सुंदर दिसत होते. केस जे मोकळे होते ते क्लिप ने बांधले आणि साडी जरा नीट केली आणि मग दरवाजा उघडला.दरवाजावर पस्तीस वर्षाची एक सुंदर स्त्री होती. मला पाहताच म्हणाल्या ” नमस्कार, मी दिया तुमच्या शेजारी राहते, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर त्यासाठी पार्टी ठेवलीये सगळ्या इमारतीतील लोकांना बोलावलंय तुम्हीपण या.”” हो नक्कीच येईल, तुम्ही बाहेर का उभ्या आत या ना.” मला पुढे काय बोलावं हेच सुचलं नाही म्हणून त्यांना आत यायचं आमंत्रण दिलं.” आत्ता नाही येत मी घाई आहे, सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय, नंतर येईल कधीतरी, तुम्ही नक्की या बरं, वाट पाहीन मी” असं म्हणून त्या निघून गेल्या आणि मी दरवाजा लावून घेतला.मी पार्टी जाणे शक्यच नव्हते, मी शक्य तितक्या लोकांना टाळते, इमारतीतील लोकं तर नकीच नको. एकदा मी सकाळी सहज म्हणून फिरायला टेरेस वर, उगाच लोकांचं लक्ष्य नको खेचून घ्यायला म्हंणून मी साधी साडी नेसून साधी राहण्याचा प्रयत्न केलेला आणि मी फिरत होते. टेरेसवर गर्दी फार नव्हती. पण सगळी माणसं मलाच बघत होती, त्यांच्या त्या नजरा झेलणं मला अशक्य झालेलं, त्यामुळे मी शक्य तिथल्या लवकर तिथून घरी आले आणि नंतर कधीही बाहेर पडायचं नाही असं ठरवलं.मी नंतर येऊन पुस्तक अवचट बसले आणि पार्टीचं विसरून गेले.दुसऱ्या दिवशी दुपारीच बेल वाजली मी साडी आणि केस सावरून दरवाजा उघडला तर पुन्हा त्याच कालच्या बाई.
To be continued…