शेजारी शेजारी- भाग 2: चहा“अहो तुम्ही आला नाही काल, मी तुमची खूप वाट पहिली.”“मी तुमच्या पेक्षा लहान आहे तुम्ही हं नका म्हणू मला, माझं नाव तामसी. तुम्ही आत या मग आपण बोलू” मी त्यांना म्हणाले.
त्या आत आल्या आणि मी त्यांना सोप्यावर बसायला सांगितलं. आणि मी त्यांना विचारलं काय घेणार तुम्ही, नाहीतर मी चहा बनवते तुम्ही पण किचनमध्येच असं म्हणून मी त्यांना किचनमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांना बसायला खुर्ची दिली. आणि मी चहा बनवायला लागले. चहा बनवता बनवता मी त्यांना सांगू लागले कि” सॉरी बर का मी काळ नाही येऊ शकले पार्टीला, ते काय झालं काम खूप होतं ना त्यामुळे जमलंच नाही.”” अहो घरातील काम तर चालतातच एक दिवस नाही केली तर काही फरक नाही पडत” त्या मला म्हणाल्या” अहो घरातील काम असतं तर ते टाळता आलं असत पण हे माझं काम होतं त्यासाठी मला पैसे मिळतात ते टाळून कसं चालेल ना?” मी पाण्यात चहापावडर टाकत म्हणाले.” अय्या तुम्ही काम करता, पण कधी दिसत नाही बाहेर जाताना” त्यांनी आश्चर्याने विचारलं.” अहो मी बाहेर नाही जात घरातूनच लॅपटॉपवर काम करते आणि तुम्ही मला तामसी म्हणा अहो म्हटल्यावर खूप मोठं झाल्यासारखं वाटतं मी लहान आहे अजून माझं लग्नहि नाही झालेलं”“काय? तुझं लग्न नाही झालं, मग तू इथे कुणासोबत राहतेस”“मी एकटीच राहते” मी त्यांच्याकडे तोंड करून उभी राहिले, माझं लक्ष्य गॅसवर आणि दियाच्या प्रश्नाकडेही होतं.” काय, एकटीच, तुला भीती नाही वाटत” त्यांना बोलण्यातून त्यांनी कधीच एकटी राहणारी मुलगी पहिली नसल्याचं मला जाणवलं.“नाही उलट मला एकटीलाच आवडतं राहायला” मी सहजच म्हणाले.“आणि तू पैसे देखील कमावते, काम पण करते”” हो करावंच लागतं ना नाहीतर पोट कसं भरणार”“धाडसी आहे तू, मला ना तुझं कौतुक वाटतं ” कौतुकाने माझ्याकडे पाहत त्या मला म्हणाल्या.” अहो कौतुक काय त्यात माझ्यासारख्या अनेक जणी आहेत ज्या एकटीने राहतात आणि कमावतात” मी चहा कपात गाळत म्हणाले.
त्या काहीच नाही बोलल्या पण मला त्यांच्या डोळ्यात कौतुक दिसले, मी त्यांच्याकडे कप दिला आणि खुर्ची घेऊन त्यांच्या शेजारी बसले. त्यांना विचारलं कि चहा कसा झाला? मस्त झालाय, त्यांनी उत्तर दिले. आम्ही तशाच काहीवेळ चहा पिट बसलो. मला काय बोलावं हे सूचत नव्हतं. पण त्यांनी माझ्याविषयी अजून बोलू नये म्हणून मग मी त्यांना त्यांच्या बद्दल विचारायला सुरवात केली, त्यांना डॉ मुले होती एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्ष्याची मुलगी. हे ऐकून मी म्हणाले कि अरे तुम्ही दोन मुलांच्या आई असेल असं वाटत नाही किती फिट ठेवलाय तुम्ही स्वतःला.हे ऐकून त्या थोड्या लाज आणि म्हणाया कि काहीही पण तुझं तामसी. चहा पियुन झाल्यावर त्या मुलांना शाळेतून आणायचं असं म्हणून निघून गेल्या, ” खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी बोलून , तू पण ये ना कधी तरी आमच्या घरी जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा” मी पण त्यांना नेहमीसारखं हो येईन ना वेळ मिळाल्यावर असं सांगून टाकलं आणि दरवाजा बंद केला.त्या दिवशी खूप दिवसांनंतर मी कोणाशी तरी एव्हडं कामाव्यतिरिक्त बोलले. मलाहि छान वाटलं पण मनात भीतीही होती कि आपण जर दिव्याला जास्त जवळ येऊ दिल तर प्रॉब्लेम होईल. आणि मी पुन्हा माझा दिनक्रम चालू केला. त्यानंतर दिव्या अशीच आठवड्यातून एकदा यायची आणि जरावेळ गप्पा मारून जायची. मलाही तिची येण्याची सवय झालेली. त्या आल्या कि मी आधी चहा बनवायचे नंतर त्याच किचनमध्ये जाऊन दोघींसाठी चहा बनवू लागली. पण तरीही मी शारीरिक अंतर ठेवून होतो मी तिचा थोडासाही स्पर्श न होऊ देण्याची मी काळजी घेत आलेलो. कारण जरी मी बाहेरून स्त्रीसारखा दिसत असलो तरी मी होतो एक पुरुष आणि स्त्रीच्या स्पर्शाने काय होऊ शकते हे मला माहित होते.