प्रणयात गुंतुनी….

वैवाहिक जोड्यांची समस्या म्हणजे कामक्रीडेत जास्त कालावधी घालवता येत नाही.  कामक्रीडेसाठी लागणारा कालावधी जास्त असला म्हणजेच कामजीवन यशस्वी होते असे अजिबात नाही. पती-पत्नी एकमेकांच्या सहवासात किती रममाण होता हे महत्त्वाचे आहे. एकत्र आनंददायक सहवासाच्या कालावधीला कोणतीही कालमर्यादा नाही. कारण पत्नीवर किती प्रेम करता यावर ही कालमर्यादा अवलंबून आहे.

पत्नीवर भरपूर प्रेम करा. तिच्या असण्याचे, दिसण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे कौतुक करा. पत्नी तुम्हाला खूप आवडते हे तिला मोकळेपणाने सांगा. तिच्या आवडीनिवडी, तिच्या इतर गरजा याबद्दल आस्थेवाईकपणे माहिती घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करा. तुमच्या भावी संसाराबद्दल तिच्याशी बोला. तिची स्वप्नं काय आहेत हे समजून घ्या. तिच्या स्वप्नांना पंख द्या. ते सत्यात आणण्याबाबत तिला आत्मविश्वासाने भरोसा द्या. तिला एक माणूस म्हणून समजून घ्या, स्वीकारा.

प्रणय म्हणजे फक्त शरीरसंबंध नव्हे तर एक प्रकारे भावनाचं मिलाप होत असतो. अशावेळी शरीरसंबंधात ती सुखी नाही असे तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या पार्टनरला त्याबाबत तसं विचारा. आणि जर ती सुखी नसेल तर मोकळेपणाने बोला.

5/5 - (1 vote)
स्पेशल कथा वाचा :  चौरंगी रिंगण भाग 17

Leave a Comment

error: Content is protected !!