प्रेरणा … भाग 11
“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा… बरोबर आहे… थकली असशील ना तू?” तिला डोळा मारत आकाश बोलला. “मी’ नाही… ‘आपण’ राहुया… प्लीज… मला नाही जायचे आज कुठेही… आजची रात्र प्लीज माझ्याबरोबर रहा… आजच मला तुझी सोबत, संगत, मैत्री मिळाली आहे… लगेच नको ना मला एकटी टाकुन जावूस…” राजश्रीच्या स्वरातील आवाहन आणि आर्तता आकाशच्या मनाला भिडली. जरी त्याचे स्वतःचे मत काहीही असेल तरी तिला हवे असेल तर थांबणे त्याला भाग होते. पण तसे न दाखवता त्याने जरा विचारवंत चेहेरा केला. आकाश विचारांत पडलेला बघुन राजश्रीला त्याला चिडवून रीझवायचा मुड आला. अर्धनग्न अंगाची मादक सळसळ करत ती त्याच्याकडे बघत …