वाचक हो कसे आहात सगळे आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी असाल समाधानी आहात आपण सगळे marsthihotkatha.com वर कामुक व शृंगारिक प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा करत आहात.
तुमचे प्रतिसाद असेच देत रहा, तसेच तुमचे अनुभव व कथा तुम्ही मला माझ्या मेल आयडी वर पाठवू शकता आणि चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी खाली दिला आहे.
चला कथेकडे वळूया,
निकी ने एका कागदावर तिचा मोबाईल नंबर लिहिला आणि सकाळच्या वेळात त्याला फोन करायला सांगितले. काही वेळाने गुप्ता फॅमिली आली, प्रकाश ने त्याच्या फाईल घेतल्या व तो गेला.
त्या रात्री निकी खूप समाधानी होती, तिला हे आवडले होते की प्रकाश ह्यांनी तिच्या भावना नीट ऐकून घेतल्या होत्या.
तिचे कॉलेज, क्लास सुरू होते प्रकाश ने नंबर घेतला तर होता पण फोन करावा की नाही हे त्याला कळत नव्हते, अशी इतक्या लहान वयाची त्याच्या आयुष्यात मुलगी अशी नव्हती. ती ही निकी इतकी सुंदर आणि इतकी श्रीमंत तर अजिबात नाही
काय करावे त्याला सुचेना, दोन दिवसांनी त्याला एक बॉक्स घेऊन गुप्ता कडे जावे लागले, तो थोडा साशंक होता की निकी ची भेट झाली आणि तिने का फोन केला नाही असे विचारले तर काय करणार, काय उत्तर देणार. पण जाणे गरजेचे होते, तो घरी गेला त्याने पार्सल दिले आणि तो थोडा समाधानाने निघाला कारण निकी घरी नव्हती.
तो खाली आला, सोसायटी च्या बाहेर येऊन शेअर रिक्षा करायला रांगेत थांबला तितक्यात मागून निकी तिची स्कूटर घेऊन आली.
निकी – “काय प्रकाश जी कसे आहात?”
प्रकाश – ” हा मी ठीक आहे तुम्ही कशा आहात”
निकी – ” तुम्ही स्टेशन ला चाललात ना, चला सोडते तुम्हाला,”
प्रकाश – “अहो नको मी जाईन रिक्षा ने”
निकी – “अहो चला बसा मी पळवून नेणार नाही तुम्हाला”
प्रकाश स्कूटर वर बसला, निकी मुद्दाम हून त्याला दुसऱ्या रोड वरून घेऊन गेली व एका साधारण दिसणाऱ्या हॉटेल च्या समोर तिने स्कूटर थांबविली.
प्रकाश – “अहो इथे कुठे,”
निकी – “तुमच्याशी थोड बोलायचे आहे “
दोघे आत मध्ये आले, एका कोपऱ्यातल्या टेबलवर दोघे बसले.
निकी ने मेनुकार्ड मागविले तुम्ही द्या ऑर्डर.
प्रकाश – अहो तुम्ही बोला.
निकी ने वेटर ला दोन पावभाजी व दोन कोल्ड्रिंक मागवले.
निकी – पहिली गोष्ट मला अहो जाहो करू नका, मला निकी म्हणा, तुम्ही माझे मित्र आहात. इथे मी तुम्हाला ह्या साठी आणले कारण इथे पापा कधीच येत नाहीत. आणि मला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे.
मी स्पष्ट बोलते मला तुम्ही मी अगदी लहान असल्यापासून आवडता, माझे तुमच्यावर प्रेम आहे असे म्हटले तरी चालेल. आपले लग्न आज्जीबात होऊ शकत नाही पण आपलं एक चांगले नाते तयार होऊ शकते ना. मला कधी वाटल तुमच्याशी बोलावेसे, भेटावे असे तर ते मी करू शकते ना. तेवढा हक्क द्याल मला.”
तिने प्रकाश च्या हातावर हात ठेवला. प्रकाश ने पटकन हात मागे घेतला,
“का काय झाले, शॉक लागला का.
मी तुम्हाला हात लावला तर नाही का चालणार.”
प्रकाश – नाही तसे नाही पण तुम्ही माझ्यात काय बघितले, तुम्हाला मी काय आवडतो.
निकी – हे मलाही सांगता येणार नाही. फक्त इतके माहित आहे की मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. मी पापा क्या बऱ्याच फ्रेंड ना ओळखते, त्यांच्या नजरेत स्पर्शात एक वेगळीच भूक मी बघितली. मी खूप आधुनिक विचारांची आहे पण हे असले स्पर्श मला नको आहेत. मला अशी व्यक्ती हवी आहे जिला मी कळते, ज्या व्यक्तीला माझ्यातल्या व्यक्तीवर प्रेम आहे. माझ्या मागे असलेला पैसा जे असले काही नको.
मी तुमच्यात माझा एक चांगला मित्र बघते.
बोला व्हाल माझे मित्र द्याल मला साथ.
तिने हात पुढे केला, तिच्या सारखी सुंदर मुलगी इतके स्पष्ट आणि मुद्द्याचे बोलेल असे वाटले नव्हते
प्रकाश – ठीक आहे, पण आपण वेळ घेऊ आधी आपली नीट ओळख होऊ दे मग बघू मैत्री वगैरे.
निकी – चालेल, त्यांनी त्यांचे खाणे संपवले आणि ते निघाले
तर मित्रांनो पुढे काय होणार आहे, निकी आणि प्रकाश ह्यांची मैत्री किती पुढे जाणार हे पुढच्या भागात बघू.
तुमचे प्रतिसाद जरूर कळवा,
मेल आयडी खाली दिला आहे
Bye