साखरपूड्यात सगळ्याचे नव्या कपड्यात रूप छान दिसत होते, पण आकर्षणाचे केद्रबिंदू होती ती फक्त “गिता”….
तिला जवळच्याच पार्लरच्या आरतीच्या मेकअपसाठी आलेल्या ब्युटिशियन महिलेने तयार केले होते … आरती सोबत गिताचा मेकअप करून ,पैठणी साडी घालून तिला श्रीमंतासारखे दिसेल असे तयार केले होते ,
गिताने पण आज खूप दिवसानंतर रिच मेकअप , चांगले कपडे व भारीतले दागिने हे सर्व अनुभवले होते…ती दुसर-यावेळी बहिणीसाठी म्हणून या घरात आज सजली होती, पण आज तिचा मेकअप हा पहिल्यावेळ्या पेक्षा कितीतरी वेगळा होता, आज मनसोक्त महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर तिच्यावर करण्यात आला होता जोडीला तो सिताची त्या घालायला दिलेल्या राजेशाही पैठणीमधील थाटमाट व अंगावर दरवळणारा अतीउच्च पर्फ़्यूमचा सुगंध गिताला सुखावत होता…
तिलापण कल्पना नव्हती एवढ्या कमी वेळात पण तिला एक शाही रितीरिवाजाप्रमाणे सजवले जाईल, ती जेंव्हा नटून थटून मंडपात आली तर तिला बघून सर्व “वॉव” करत होते, काहीच्यां तोंडून शब्द निघत होते, ” बहिण एवढी सूंदर तर नवरी किती सूंदर असेल ” …..
ती मंडपातील बायकात येऊन बसली तर रमाकान्त चेतनला तिच्याजवळ द्यायला गेला पण भारी मेकअप व कपड्यातील आईजवळ तो पण जाईना , फ़ोटोग्राफ़रनेही तिच्याकडे मोर्चा वळवून फोटो काढणे सुरू केले, व्हीडीओ शुटिंग कैमरा पण तिच्या हालचाली टिपत होता .
प्रत्येकाची कथा वेगळी… स्वप्ने वेगळी… दुःखं वेगळी… आणि त्या दुःखांना हाताळण्याची पद्धतही वेगळी…व तशीच या वाघ कुंटूबाची कथा वेगळी होती. आतातरी त्या साखरपूड्याच्या सोहळ्यात आरती ही वधू असलीतरी खरी परी “गीता” च वाटत होती. रमाकान्त तिलाच कुतूहलाने पहात होता, ती पण चेतनला बघायचे निमित्त करून त्याला स्माइल देत होती.
वराने म्हणजे नागेशने वधूला निवडली असून लवकरच त्यांचा विवाह होणार असल्याची ग्वाही म्हणून आजचा हा सोहळा थाटामाटात पार पडत होता ,आज आरतीला प्रथम वराच्या आई-वडिलांनी म्हणजे नागेशच्या आईवडीलांनी साडी, ब्लाउजपीस, अलंकार, गजरे, इ.दिले. नंतर वधूच्या आईवडिलांनी वराला चौरंगावर बसवून पोशाख वगैरे देऊन त्याचा सत्कार करायचा होता पण सोपानराव पिऊन पंग होते मग गिताच्या घरच्यांनी ठरवलेल्या प्लाननूसार तिला पुढे केले व तिच्या भावाने रमाकान्त कडून चेतनला घेतले , गिता बरोबर पाठवले ,जिजू सालीला नवराबायको म्हणून वर पुजेला बसवले. “का बरे केले असेल ?” हा प्रश्न गिताला पडला होता पण रमाकान्त जिजू सोबत असल्याने व हि प्रश्न विचारायची वेळ नसल्याने तिने विधी चूपचाप पार पाडला. आरतीचा होणारा नवरा नागेश समोर पूजेला बसलेल्या सालीचे रूप पाहून अवाक झाला होता ….नंतर दोन्ही कडून वरवधूचे मामांनी समोरासमोर बसून गणपतीपूजन व वरुणपूजन केले. वधू-वर कपडे बदलून आल्यानंतर दोघांना पहिल्यांदा सोबत बसवून , त्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांचे परत मामाकडून तसेच सुवासिनी बायकांनी हळद-कुंकू लावून पूजन केले, त्यांच्या तोंडात पेढा भरला, राहीलेला विधी भटजीनी फास्ट पुर्ण केला , त्यानंतर अंगठी घालण्याचा विधी पार पडला . नागेश व आरतीने एकमेकांच्या बोटात अंगठी घालून पेढा भरवला.
आता सुरू झाले फोटो सेशन , ओळखीचे सत्र अन येथेही गिताला अचंबित करेल असेच घडले कारण रमाकान्तने सर्वासमोर गिताच्या जवळ येऊन तिचा हात पकडून तिला घेऊन वरवधूसोबत फोटो काढायला घेऊन गेला , ती पण चूपचाप त्याच्या सोबत हातात हात पकडून उभी होती.
…आणि आता दोघे त्या वधूवराच्या जवळ जाताच आरतीने नागेशला नंबर दोनचे जिजू व ताई अशी ओळख करून दिली, तो नागेश यावेळीही कधी रमाकान्तकडे पहायचा तर कधी गिताकडे पहायचा … गिताने जेंव्हा त्याला हसत “ छोटे जिजू उखाणा घ्याल का?” असे विचारले तेंव्हा तो घायाळ झाला ,
ताई म्हणण्याची इच्छा नसताना गिताला बोलला की “ ताई मी नागेश फुलारे, उखाणा मात्र मला येत नाही” तेंव्हा चौघेही हसायला लागले. हे सर्व हकीगतमधे घडत होते पण गिताला स्वप्नांच्या दुनियेत गेल्याता भास होत होता कारण आज तिच्या घरच्यांनी चक्क तिच्या जिजूला तिचा नवरा बनवून प्रोजेक्ट केले होते….तिने वर वधूसोबत फोटो काढले, ग्रुप फोटोतसुध्दा रमाकान्त तिला चिपकून उभा होता, जेवणानंतर शिदोरी घेऊन पाहूणे परतीसाठी निघून गेले….
लेखक ~रावसाहेब चव्हाण