रमाकान्त सिताच्या आजारपणामूळे त्याच्या विवाहीत सालीसोबत म्हणजेच गीतासोबत प्रेमसंबंध वाढवून तिला वश करू पहात होता, त्याचे गीताच्या गुंठेवारीतील त्या छोट्या पत्राच्या रूमवर आता येणे जाणे खूप वाढले होते. हे जिजू सालीचे प्रेम जुळवून यायला ‘आरतीचा’साखरपूडा निमित्त झाले होते, तर राधा व आमदाराच्या लोणवळ्यातील रिसोर्टवरील मिलनामूळे आरतीचे जमलेले लग्न तूटण्याच्या नौबत आली होती.
वाघ कुंटूबाचा चांगला इंजीनियर मुलगा आरतीला मिळाला हा भ्रमनिरास व्हायला वेळ लागला नाही. काही कामानिमित्त तिचे सासरे लोणावळा गेले होते एका ठिकाणी जाताना वाहतूक किंचित मंद झाली होती. चौकातील एका कोपर-यात त्यांना आमदार व राधा फिरतानी दिसले, राधाला त्यांनी ओळखले … त्यांनी त्यांचा पाठलाग केला, गाडीत बसल्याबरोबर गाडी थोडी एकातांत गेली , गाडी थांबली , ड्रायवरला काहीतरी आणायला त्यांनी पाठवले, आता गाडीत बसलेले आमदार राधाच्या अंगावरून हात फिरवत होते अन तीपण रिस्पॉन्स देत होती ,दोघेही हसत होते.
आरतीच्या होणार-या सासरेबुवाला ते सहन झाले नाही, मोठी बहिण बदचलन आहे तर लहानी कशी असेल ? या विचाराने ते हैराण झाले . तरीपण त्यांनी रिसोर्टपर्यत त्या दोघांचा पाठलाग केला अन तेथून माहिती घेतली तर ती व्यक्ती आमदार असून त्याने नवराबायको सांगून तेथे सूट मिळवला होता .
त्याचदिवशी आरतीच्या सासर-याने तिच्या भावाला म्हणजे आदर्शला निरोप पाठवला की “तूमचा आतापर्यतचा खर्च किती झाला ते सांगा , त्यात थोडा वाढवा टाकून मी परत करतो पण तूमच्या बहिणीसोबत लग्न करू शकत नाही” अन हा निरोप मिळताच सोपानराव वाघ कुंटूबातील वातावरण सून्न झाले. आदर्शने जवळच्या नातलग मित्रांना बोलावून दुसर-या दिवशीच संगमनेर गाठले… चहापाणी सुध्दा घ्यायला नकार देऊन , रागानेच त्या पाहुण्यांना विचारले की “ असे काय घडले की तूम्ही साखरपूडा झाल्यावर लग्न मोडता आहात?”
“ त्यावर आम्हाला स्पष्टीकरण द्यायचे नाही” असे पाहुणे बोलताच , आदर्श एकदम भडकला व जोरजोरात खालच्या स्तरावर शिवीगाळ करून त्यांना भांडू लागला मग पाहुण्यांनी हळूच त्याला बाजूला घेतले व त्यांनी काल लोणावळ्यात बघितलेले ‘राधा व आमदाराचे’ चाळे याबद्दलची सर्व डोळ्याने बघितलेली कथा सांगीतली. शेवटी त्याला बोलले की “ आवाज करू नको , झाकली मूठ झाकलेली ठेऊन तू येथून निघून जा “ … सोबत त्यांनी त्याला एक कोरा चेक दिला व त्यावर तूमच्या झालेल्या खर्चाचा आकडा टाकायला सांगितले . आता आदर्शने चूपचाप अंदाज़े आकडा त्या चेकवर टाकला , पाहूण्याने सही करून चेक हातात देताच व आदर्शने तो खाली मान घालून घेतला अन परतीला निघाला.
सोबतचे विचारात होते आदर्श असे काय झाले की तू चूप झालास , काय सांगितले त्या पाहुण्यांनी की तू चूप झालास? आदर्शला आता काहितरी सांगावे लागणार होते मग बहिणीची बदनामी होईल असे तो बोललेच कसा? त्याने राधामूळे आरतीचे लग्न मोडल्याचे सांगण्याएवजी, तो गाडीत आलेल्या सोबतच्यांना बोलला की मुलाचे वडील सांगत होते की “ मुलाचे एका मुली बरोबर अफेयर आहे अन तो तिच्यासोबत लिव इन रिलेसनशिपमध्ये रहातो आहे, तूमच्या बहिणीचे वाटोळे व्हायला नको म्हणून लग्न मोडण्याचा निर्णय घेतला”… हे समजताच गाडीतीलच नाहीतर घरचेपण सगळे “ चांगले झाले लग्नाआधी समजले “ असे म्हणून समाधान व्यक्त करत होते.
पण आदर्शने रात्री आईवडील , बायको , आरती , रमाकान्त जिजू , सिता व आरती यासर्वासमोर रडतच राधाच्या बाहेरख्यालीपणामूळे लग्न मोडल्याचे सांगितले. शेवटी सर्वानी त्याला समजावले व आपलेच दात अन आपलेच ओठ असल्याने काहीएक करता येणार नाही यावर त्यांचे मत बनले . पण सिताने एक सुचवले की “जी नशीबवान आहे , चारीत्र्यवान आहे तिला आपण वाळीत टाकले तेंव्हा तिला आता जवळ करून राधा ताईला थोडे भाव देणे कमी करा” या मताला रमाकान्तचा भरभरून सपोर्ट केला, आरती पण तसेच बोलली अन मग सर्वानी तिला जवळ फ्लैट घेऊन देण्यावर सहमत झाले.
एका कामपिपासू व पैशाची अती हाव असलेल्या राधाला आता माहेरच्यांनी बेदख़ल केल्यावर अख्खे रान मोकळे मिळाले होते.
तर आदर्श व रमाकान्तने गिताकडे जाऊन तिला व सुयोगला वाघ कुंटूबाच्या वाड्याजवळून अगदी जवळच असलेल्या पॉश वसाहतीमधील एक फ्लैट दाखवला. तो दोघांनाही पसंद आला , चक्क नगदी पैसे देऊन तो आदर्श व रमीकान्तने हातोहात गीताच्या नावे खरेदी करून टाकला. पुढील आठ दिवसात त्या ती खोल्यांचा फ्लैट मध्ये ते दोघे शिफ्ट होण्याआधी रमाकान्तने रेडीमेड फर्निचर विकत घेऊन त्याला पॉश बनवले. सुयोगच्या हे समजण्याबाहेरचे होते मग त्याने एकदिवस विचारलेच ..”गीता तूज्या घरचे एवढे मेहरबान कसे काय झालेत?”
तर तिने राधामूळे आरतीचे लग्न मोडल्याची व राधाच्या बाहेरख्यालीपणाची कथा त्याला एेकवली पण खरेतर तिलाही आश्चर्य वाटत होते मग एकदिवस त्या नविन फ्लैटवर सुयोग कामाला जाताच रमाकान्त जिजूला बोलावले असताना तो आल्यावर तिने त्याला सुयोगच्या मनातील शंका बोलून दाखवली, त्यावर रमाकान्त गीताच्या त्या मदमस्त शरीरावरून हळूच डोळे फ़िरवत बोलला की “त्याच्या मनात हे असले विचार येणे स्वाभाविक आहे पण खरे कारण डियर गीता तूला माहित आहे “
“ते काय ?”
असे मादक स्माइल देत ती बोलली , तिने दिसायला सभ्य दिसतील असे पण वारंवार नजर वळेल असे कपडे घातले होते. तिच्या परिस्थितीबाबत कीव आल्याने की सौंदर्याची जादू पडल्याने माहीत नाही, पण रमाकान्त जिजू तिच्यावर मेहरबान झाला होता. आरतीच्या सखरपूड्यानंतर महिन्याभरात झालेल्या बर-याच भेटींनंतर ’ जिजू आता कधीही गीताच्या घरी येऊ शकतो’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
तरी तो बोलला की “ आय लव यू , म्हणूनच मीच हे सगळे तूज्यासाठी आदर्शला मध्ये घालून केले, तू खूष आहे ना आता”
असे म्हणून त्याने तिला बाहूमधे ओढले ….
लेखक ~रावसाहेब चव्हाण