चौरंगी रिंगण भाग १६
नितु : घरी येतानाच मी माझ्या ऑटो घरा जवळचा बाजारातून थोडा भाजीपाला, उद्यासाठी मासळी साठीचा मालवणी मसाला, पनीर, green peas, आम्रखंड श्रीखंड, इत्यादी सामान खरेदी केलं तसे माझा राजन किराणा बाजारहाट फावल्या वेळात नेहमीच करून मला मदत करायचाच म्हणा घरी आल्यावर मी माझ्याकडच्या चाव्याने दाराची कुलपे उघडुन आत शिरले, वॉशरूम मधे जावून फ्रेशहोउन बाहेर आले आणि दाराची बेल वाजली दार उघडुन माझ्या राजनला घरात घेवुन विचारलं काय रे कशी होती आज ची तूझी ओरल exam ? अगदी मस्तच गेली, सकाळी माझीच पहिली ओरल एझमिनरने घेतली घरी येवून जेवण करून …