प्रेरणा … भाग 7
“म्हणुनच तुला सांगतो तू परत नोकरी कर… तेवढेच तुझेही मन गुंतलेले राहील आणि एक ठराविक रक्कम घरी येईल. तुझी ओढाताणसुद्धा कमी होईल.” आकाशने तिला सुचवले. तिने फक्त मानेच्या झटक्याने त्याची आयडिया भिंतीवरची पाल झटकावी तशी झटकून टाकली. “आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते… सो, हा उपाय बाद… माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही” “मान्य आहे पण म्हणुनच मी जमतील ते सगळे प्रयत्न …