आजोळचे सुख 2
ते गोड धक्के सहन करत ते एकदाचे घरी पोचले. आजीने दारात तिच्यावरुन भाकर तुकडा ओवाळला व तिने आजीला वाकुन नमस्कार केला व घट्ट मिठी मारली. “कशी असा तु पोरी? बरी होती का तुजी परिक्षा? आज किती वर्षाने रहायला येतेस पोरी.” तिने मान हलवत आजीच्या शेजारी उभी असलेल्या जयामामी कडे पाहिले. तिने मनाशी ठरवले होते, तिला काही झाल तरी जयामामीच बोलायच. ती तिला पाया पडायला वाकली पण जयाने तिला घट्ट मिठी मारली, सकळभर त्या चौघांच्या गप्पा झाल्या मग मजेत जेवण झाली. जेवण झाल्यावर आजी झोपायला गेली. आजी आत जाताच अमितमामाला …