आकस्मात.. भाग 8
तीन-तीन पेग्ज झाल्यावर सुरेशने बिल मागवताच मी वेटरला बिल कॅन्सल करायला सांगून अजून एक नीप मागवली. सुरेशने माझ्याकडे प्रश्नार्थक पहिले.” अरे बस रे आरामात.. कसली घाई आहे तुला ? ” मी असे म्हणताच तो पुन्हा जाग्यावर बसला. मी एक-एक पेग बनवून पुन्हा एकदा ‘चियर्स’ केले. ” काय विशेष ?” सुरेशने विचारताच ” रेखा.” हा एकाच शब्द बोलून मी गप बसलो. मी हळूच गाडी “रेखा’च्या विषयावर आणताच सुरेशच्याही बोलण्यात आपसूकच उत्साह आला. ” आय सी.. कुठपर्यंत पोहचलास’ संज्या तू ?” हे विचारतांना त्याचे डोळे लकाकत होते. ” आतापर्यंत तर ठीकच चालली आहे गाडी..” मी मोघम उत्तरलो. ” मुक्कामावर पोहोचली की नाही रे ?” सुरेशने विचारले. ” म्हणजे ?” मी …