परतफेड भाग १
माणसाचं आयुष्यात असणे आणि नसणे सारे काही प्रारब्धावर अवलंबून असते असा माझा तरी समज आहे. कोणी कितीही प्रयत्न करू म्हणाले तरी नियतीसमोर मनुष्याला गुढगे टेकावे लागतात. मला मानसिक त्रास होत होता. नंदाच्या अकस्मात जाण्याचा तर होताच पण माझ्यामुळे तिला आलेले अपघाती मरण दुर्दैवी होते. माझ्या मनाने त्या घटनेचा प्रचंड दबाव घेतला होता. नंदाच्या बाबतीत माझी कामुक भूक तिला भोगल्यानंतर सुद्धा शांत होत नव्हती आणि ती तर आता स्वतःच अस्तित्वापलीकडे गेली होती. आजवर शरीरधर्मापलीकडे स्त्रीसोबत मी कधीच गुंतलो नव्हतो. माझे मन पश्चातापाच्या अग्नीत होरपळत होते. ती स्वतः तिच्या प्रियकराच्या आठवणीत …