विवाह संस्कारातील आद्यविधी म्हणजे साखरपुडा ,मुला मुलीच्या पालकांनी विवाह (लग्न) जुळल्याबद्दल बोलून केलेला ठराव यालाच शास्त्रात वाङनिश्चय व व्यवहारात साखरपुडा असे संबोधतात.
आज तोच साखरपूडा सोपानराव वाघ व सौ. मालनबाई वाघ यांच्या सर्वात शेवटच्या मुलीचा म्हणजेच आरतीचा पार पडत होता. त्यांच्या त्या वाड्यातील मोकळ्या जागेत मंडप टाकून सोहळ्याची सर्व तयारी करण्यात आली होती. त्यांचा मोठा मुलगा आदर्श हा त्याच्या मित्रांच्या मदतीने जातीने सर्व सोहळ्याच्या तयारीकडे लक्ष ठेऊन होता. सोपानराव सरकारी नौकर असूनही नेहमी दारू पिऊन पंग असायचे , असा कार्यक्रम तर त्यांच्या साठी पर्वणी असायचा ….त्यांचे मोठे जावई ,तेही तसेच सरकारी नौकर पण नेहमी राजकारणाबद्दल गप्पा करण्याचे त्यांना व्यसन होते , त्यामूळे असे ते विनायक जाधव हे कुठल्याही कामाचे नव्हते , त्यांना राजकारण शक्य नाही म्हणून त्यांनी पत्नी सौ. राधा जाधवला एका राजकीय पक्षात काम करायला मजबूर केले होते.
यामूळेच आज रमाकान्त कोरडेची वर्णी गिताला आणण्यासाठी लागली होती , हे महाशय सितापेक्षाच दहा वर्ष तर गितापेक्षा बारा वर्ष मोठे होते पण चांगलेच रंगेल होते…. असो या रमाकान्त कोरडेनी गिताला तिच्या नवर-याच्या परवानगीने आणून कार्यक्रमस्थळी म्हणजेच तिच्या वडीलाच्या घरी सोडले ….तिथे तिच्या घरचे पाहूणे बरेच आले होते, सिताची सासूपण होती… तिने लगेच तोंड वाकडे केले, गिताने जाताच तेथील काही ओळखीच्या लोकांच्या वयस्क पाहुण्यांचे पाय पडले , ती तेथे गप्पा मारण्यात दंग होणार तोच तिला राधाने पकडून तिला मालनबाईकडे घरात आणले…
“ माय गं हे काय घालून आली?” गिताला पंजाबी ड्रैसवर पाहून चकीत होत त्या बोलल्या…. गिताला अपेक्षित होते की आई जवळ घेईन वर्षभरानंतर भेंटते म्हणून तिच्या बद्दल , सुयोगबद्दल व चेतनबद्दल विचारपूस करेल पण तसे काहीच झाले नाही. तिची मोठी बहीण महागडी साडी घालून , खूप दागिने घालून मिरत होती….
तेच गिताकडून तिच्या आई व बहिनीला अपेक्षित होते, मग लगेच गिता बोलली की “ रस्त्याने जिजू बोलले की सीता दिदीला बरे नाही”
“ तिला बरे नाही म्हणून तर तूझी गरज पडली” राधा असे स्पष्ट बोलली
“ ते कसे काय ताई?”
“ ते तूला वेळ आल्यावर समजेल, आता लवकर फ्रेश होऊन ये, आरतीच्या मेकअपला पार्लरवाली आली आहे, तिच तुझे सर्व आवरून देईल”
“ पण चेतनचे काय करू?”
“ रमाकान्त जिजू सांभाळताय ना त्याला, चल तू लवकर आवर , मी तूज्यासाठी साडी, दागिने आणते” असे बोलून गीताला राधाने बाथरूमला फ्रेश व्हायला पाठवले तर ती स्वत: सीता ज्या बेडरूममध्ये झोपली होती तेथे गेली…
यावेळी सीता त्या रूममधील बेडवर झोपून होती , तीचे अंग फुल तापलेले होते , मागील आठ दिवसापासून आजारी पडल्याने नेमकं काय झाले याचे तिला काहीएक कळत नव्हते, डॉक्टरांनी औषधपचार करूनही तिला बरे वाटत नव्हते…. त्यातच तिची सासू फार खडूस स्री होती, सीताला लग्न होऊन पाच सहा वर्ष झालेतरी पुत्रप्राप्ति होत नसल्याने ती सतत टोमणे मारायची, कधी कधी रमाकान्तला दुसरे लग्न करून घे म्हणायची…त्या सीताला माहेरी सासरी श्रीमंती असून सुख नव्हते .
“ सीता तूझी पैठणी व दागिने दे , गिताला आणले जिजूने , तिला देते …”
“ ताई आधी तिला इकडे पाठव , मला भेटायचे ग तिला व तिच्या बाळाला, किती दिवस झाले भेटलेच नाही”
“ अग बाई आधीच उशिर झाला, ती गिता कसातरा पंजाबी ड्रैस घालून आली, तिला लवकर तयार करणे जरूरी आहे, पाहुणे यायची वेळ झाली”
“ ठिक आहे ताई , तिचे आवरून झाले की मला भेटायला पाठव “
“ पाहुणे गेल्यावरच तिला इकडे पाठवेल , समजलं का!”
“ ते तेथे काढून ठेवले साडी , दागिने तर घेऊन जा” असे सीताने खुणवताच राधा ते घेऊन तरातरा निघून गेली, ती येईपर्यत गिता बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली होती .
राधाने ते कपडे व दागिने तिच्या हवाली केले …
गिताने याच घरात आई-वडीलांच्या छत्रछायेत वाढल्यानंतर , त्यांच्या मर्जीने नाहीतर तिच्या मर्जीने तिला आवडणार-या खाजगी कंपनीत नौकरी करणार-या सुयोगसोबत लग्न केले होते , जवळपास तीन वर्षापुर्वी आईबापाच्यां घरट्यांतून ती लहानाची मोठी होऊन आपले जिजूसोबतचे प्रेम विसरून ती पॉश एरीयातून गुंठेवारीतील चार पत्र्याच्या घरट्यात गेली होती पण तिला हवी असलेली ऊब तिथे सुयोगकडून मिळाली होती म्हणून ती त्याच्यासोबत संसारात चांगलीच रमली होती…..
आज मात्र तिच्या आयुष्यातला ‘तो’ खराब दिवस उजाडला होता , तिचा विवाह तिच्या आवडत्या पुरूषासोबत झाला होता म्हणजेच सुयोगसोबत झाला असला, तिच्या गळ्यात त्यच्या नावाचे मंगळसुत्र घातल्या गेले होते तरी तिच्या माहेरच्यांनी त्याला आरतीच्या साखरपूड्याला मुद्दाम होऊन टाळले होते, सगळ्या घरपाहुण्यांची लगबग वाड्यात व बाहेर सुरू होती, त्यात गिताचा भाऊ आदर्श, त्याची बायको रचना, बहिण राधा व तिचा नवरा विनायक हे येणार-या पाहुण्यांचे स्वागत करत होते…
अखेर नवरा मुलगा व त्यांच्याकडील मंडळी आली , स्वागताची औपचारिकता पुर्ण झाल्यावर पाहुण्यांचे चहापाणी झाले, सर्व आवराआवर झाल्यावर भटजीने विधी सुरू केला ….
लेखक ~रावसाहेब चव्हाण