सेक्स करताना मनात हमखास येतात ‘हे’ प्रश्न, तुम्हालाही पडतात का?

आपल्याकडे सेक्सबद्दल फार उघडपणाने बोलले जात नाही. ते बोलणं अजूनही काही लोकांना पाप  वाटतं किंवा मग संस्काराच्या बाहेरचं. लाखोवेळा जरी ओरडलो की, सेक्स ही आयुष्याची गरज आहे. तरी लोक तुमच्याकडे अशा  नजरांनी पाहतात की तुम्ही काहीतरी मोठा गुन्हा करत आहात. मग काय सेक्सबद्दल  जाणून घेण्याची काही इच्छा असेल तर इंटरनेटची मदत घ्यावी लागते. तुम्हाला माहीत आहे का? सेक्स करताना आपले मन कधीच शांत नसते. कितीतरी प्रश्न आपल्याला नेमके त्याचवेळी पडतात. सेक्स करुन झाल्यानंतर आपल्याला असा विनोदी प्रश्न कसा पडू शकतो? असा आणखी एक प्रश्न पडतो आणि आपल्याला हसूच येते. आता तुम्हाला उत्सुकता असेल की हे प्रश्न नेमके कोणते? ते बघणारच आहोत पण त्याहीपेक्षा हे प्रश्न आल्यानंतर त्याचा तुमच्या सेक्सवर किती परीणाम होऊ शकते ते पण वाचा.

मी बरोबर करतो / करतेय ना?

सगळा मूड सेट असताना आणि सेक्स सुरु झाल्यानंतर मनात पहिला येणारा प्रश्न  म्हणजे हे बरोबर आहे का? म्हणजे जे काय सुरु आहे ते बरोबर आहे ना? व्हिडिओमध्ये असचं काही दाखवलं होतं. पण प्रॅक्टिकली हे बरोबर आहे का? असा विचार अनेकांच्या मनात डोकावतो. विशेषत: मुलांना पडतो. कारण त्यांना नेहमी असं वाटतं की, सेक्स ही गोष्ट पुरुष लीड करत असतात. त्यामुळे त्यांना त्यावेळी मी परफेक्ट आहे असं दाखवायचं असतं त्यामुळे सेक्स करेपर्यंत आणि ते होईपर्यंत दोघांच्या मनात हे विचार असतात.

यावेळी गेल्यावेळेपेक्षा जास्त व्हायला हवं

चूक किंवा बरोबर हे ठरतं नाही तर लगेच दुसरा प्रश्न मनात येतो तो यावेळी थोडा जास्तवेळ सेक्स करायला हवं त्यासाठी काहीतरी नवीन ट्राय करायला हवं.. सेक्सपेक्षा सेक्स आधीचा फोर प्ले महत्वाचा असतो.  तो फोर प्ले तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एन्जॉय करा. सेक्स कितीवेळ करायला हवे यासाठी काही प्रमाण वेळ ठरविण्यात आलेली नाही. तुमचा पार्टनर तुमच्या सेक्स मुव्हजमध्ये आनंदी असेल तर सेक्सचा मनमुराद आनंद लुटा हा प्रश्न सोडून द्या.

नवी पोझीशन ट्राय करायची का?

सेक्स अधिक चांगले करण्यासाठी नवी सेक्स पोझीशन ट्राय करायची अनेकांना हौस असते. पण नवी सेक्स पोझीशन तिला/त्याला आवडेल का? आता या सेक्स पोझीशनसाठी कसं विचारायचं? असे प्रश्न पडायला लागतात. पण ते विचारण्यापेक्षा केलेले चांगले असते. कारण अशा विचारण्याने समाेरच्याच्या मनातही प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणून विचारु नका तर करा. कारण त्यातच तर आयुष्याची मजा आहे.

5/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!